म्हणून अजित पवार, टोपे यांना साताऱ्यात यावं लागतंय

रूग्णवाढीचा राज्याचा दर ०.४७ टक्के असून या तुलनेत साताऱ्याचा रूग्ण वाढीचा दर १.३७ टक्के आहे. तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेटमध्ये सातारा दुसऱ्या क्रमांकावर असून पॉझिटीव्हीटी रेट २०.०२ टक्के आहे. पाहिल्या क्रमांकावर सिंधुदूर्ग जिल्ह्याचा असून त्याचा पॉझिटीव्हीटी रेट २१.३६ टक्के आहे.
म्हणून अजित पवार, टोपे यांना साताऱ्यात यावं लागतंय
The second wave of Corona included Satara district in the red zone

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Pandemic) सातारा जिल्ह्याचा रेड झोनमध्ये (Red Zone) समावेश झाला आहे. राज्याच्या रूग्ण वाढीच्या संख्येच्या तुलनेत सातारा जिल्ह्याची टक्केवारी १.४७ असून राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. सक्रिय रूग्ण संख्येत सातारा राज्यात चौथ्या क्रमांकावर असून सध्या जिल्ह्यात कोरोनाचे १९ हजार ९५८ रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न अपुरे पडत असून यावर तोडगा काढण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) शुक्रवारी साताऱ्यात येऊन आढावा घेणार आहेत.  The second wave of Corona included Satara district in the red zone 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना सध्या जनता करत असून सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६७५ बाधित आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे ३० टक्के आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सातारा जिल्ह्यात ९१५१ सक्रिय रूग्ण होते. तर दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १९ हजार ९५८ रूग्ण उपचार घेत असून गेल्यावेळच्या तुलनेत यावेळेस ११८ टक्क्यांनी सक्रिय रूग्ण संख्येत वाढ झाली आहे.  त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे ५६ लाख ५० हजार ९०७ एकुण रूग्ण संख्या असून
त्यापैकी ५२ लाख ४१ हजार ८३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्राचा रूग्ण बरे होण्याचा दर ९२.७६ टक्के आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ९१ हजार ३४१ जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यूदर १.६२ टक्के आहे. राज्यातील सक्रिय रूग्ण संख्येच्या पहिल्या दहा जिल्ह्यात सातारा चौथ्या क्रमांकावर असून रूग्ण वाढीच्या दरात सातारा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

रूग्णवाढीचा राज्याचा दर ०.४७ टक्के असून या तुलनेत साताऱ्याचा रूग्ण वाढीचा दर १.३७ टक्के आहे. तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेटमध्ये सातारा दुसऱ्या क्रमांकावर असून पॉझिटीव्हीटी रेट २०.०२ टक्के आहे. पाहिल्या क्रमांकावर सिंधुदूर्ग जिल्ह्याचा असून त्याचा पॉझिटीव्हीटी रेट  २१.३६ टक्के आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत एक कोटी ६९ लाख २० हजार ६१६ जणांचा पहिला डोस पूर्ण
झाला आहे. तर ४४ लाख ३१ हजार ७०७ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. ४५ वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणात सातारा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत ५३.८३ टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in