जे काय बोलायचं ते पुरवणी बजेटमध्ये बोला...  - Say what you want in the supplementary budget ..: Says Sabhapati Ramraje Naik Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

जे काय बोलायचं ते पुरवणी बजेटमध्ये बोला... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

या गोंधळातच महापालिका, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक तसेच पुरवणी मागण्या व खर्चा विवरण पत्र सादर करण्यात आले.  यावेळी विरोधक सभापती न्याय द्या...सभापती न्याय द्या.., अशी घोषणाबाजी करत होते. या गोंधळामुळे सभापतींनी पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज स्थगित केले. 

सातारा : अतिवृष्टी, कोरोनाचा संसर्ग, कायदा आणि सुव्यवस्था, मराठा आरक्षणाचा विषय यासर्वबाबी  लक्षात घेता दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनत वेळेचे नियोजन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुरवातीला अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. मात्र, सभापतींनी तुम्हाला जे काही बोलायचे ते पुरवणी बजेटमध्ये बोला, तेथे सरकार तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल, असे सांगून या विषयांवर बोलून दिले नाही. त्यावर विरोधक संतप्त झाले व त्यांनी गोंधळ घालत सभापती न्याय द्या...सभापती न्याय दद्या...अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापती रामराजेंनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केले. 

विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. सुरवातीलाच विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरून युवक आक्रमक झाले असून ते मुंबईतील आझाद मैदानाकडे कुच करत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

ते म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानाकडे युवक कुच करत आहेत. त्यावर
सभापती रामराजेंनी त्यांना आडवत थोडक्यात बोलला, असे सांगितले. मी बाहेरच्या घडामोडींकडे सभागृहाचे लक्ष वेधत असल्याचे सांगून श्री. दरेकर म्हणाले, ओबीसी समाजात संभ्रमावस्था आहे.

मराठा समाजाच्या मुलांचा विषय महत्वाचा आहे, असे सांगत असतानाच सभापतींनी त्यांना खाली बसा असे सांगितले. या विषयावर चर्चा होऊन
देणार नाही, असे सांगितले. त्यावर श्री. दरेकर यांनी बाहेर चाललंय ते संवेदनशील आहे. यावर सभापतींनी कोरोना आपत्तीत आपल्याला काळजी घेऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे दोन दिवसांचे अधिवेशन घेतले आहे. जे काही बोलायचे पुरवणी बजेटमध्ये बोला. आजचा दिवस शोकसभेत श्रध्दांजली वाहण्यासाठी घालवा, असे सांगितले. 

त्यावर श्री. दरेकर यांनी सध्या अतिवृष्टी, कोरोना संसग, कायदा व सुव्यवस्थेसह आरक्षणाचा विषय आहेत. या सर्व विषयांवर चर्चेसाठी आपण कसे वेळेचे नियोजन करणार आहोत. त्यासाठी अधिवेशन दोन दिवस वाढवावे, त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, अशी दरेकर यांनी मागणी केली.  त्यावर सभापती रामराजेंनी मला तुमचे सर्व मान्य आहे. पण वेळ मिळाला तर ते करणार आहोत. सगळ्यांची तयारी असेल उद्या सकाळी
दहापासून अधिवेशन घेऊ, त्यामध्ये बोला किती दिवस बोलायचे ते, असे सांगितले.

 हा वाद सुरू असतानाच शेकापचे जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलनाचा विषय मांडत महाविकास आघाडी सरकारने शेतकरी आंदोलनास यापूर्वीच पाठींबा दिला आहे. त्यामुळे स्वतंत्र कायदा करण्यासाठी हे विधेयक पुन्हा आणले पाहिजे, असा ठराव दोन्ही सभागृहात करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली.

या गोंधळातच महापालिका, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक तसेच पुरवणी मागण्या व खर्चा विवरण पत्र सादर करण्यात आले.  यावेळी विरोधक सभापती न्याय द्या...सभापती न्याय द्या.., अशी घोषणाबाजी करत होते. या गोंधळामुळे सभापतींनी पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज स्थगित केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख