महापालिका निवडणूक महाआघाडी कशी लढविणार, हे सतेज पाटलांनी उलगडून सांगितलयं.. - Satej Patil explained how the Mahavikas Aghadi will contest the municipal elections. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

महापालिका निवडणूक महाआघाडी कशी लढविणार, हे सतेज पाटलांनी उलगडून सांगितलयं..

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 सप्टेंबर 2021

पंधरा वर्ष महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूका आणि त्यानंतरची गणिते वेगळी असतात. 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणूका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वेगवेगळ्या पध्दतीने लढवतील. पण, निवडणूकीनंतर आम्ही सर्व एकत्र येवू शकतो, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले. जिल्हा काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी गुलाबराव घोरपडे आणि सचिवपदी सुर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, शशांक बावचकर यांची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. Satej Patil explained how the Mahavikas Aghadi will contest the municipal elections.

काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांचा अखिल भारतीय तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री. पाटील म्हणाले, गेल्यावेळी महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढलो होतो. त्यानंतर आम्ही एका विचारधारेमुळे एकत्र आलो आहोत. पंधरा वर्ष महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूका आणि त्यानंतरची गणिते वेगळी असतात. 

हेही वाचा : भाजप नगराध्यक्षाकडून गर्भवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल

निवडणूका वेगवेगळ्या लढाव्या लागतील, मात्र, निवडणूकीनंतर आम्ही एकत्र येवू शकतो. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही तो अधिकार आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अस महाविकास आघाडी राज्याच्या सत्तेत आहे. महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रत्येक पक्षाला आपआपल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागले त्यांना सत्तेत आणावे लागले यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतील. पण, त्यानंतर मात्र आम्ही एकत्र येवू शकतो, असेही श्री पाटील यांनी सांगितले. 

गोकुळमध्ये जाधव यांचा चर्चेतून तोडगा

33 वर्षांनंतर गोकुळ सभासदांच्या मालकीची संघ झाला आहे. दुधाला दोन रुपये जास्त दिला आहे. यापार्श्‍वभूमीवर, मुरलीधर जाधव यांना गोकुळमध्ये स्विकृत संचालक म्हणून घेण्याचा मुद्दा राज्य पातळीवरील आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करुन यातून तोडगा काढणार आहे. त्यांचा योग्य सन्मान कसा होईल, याचा विचार केला जाईल. पण आपणच आपल्या जिल्ह्यातील संस्थेला बदनाम करु नये अशी विनंतीही श्री. पाटील यांनी केली.

राजू शेट्टींनी वेळ द्यावा 
माजी खासदार राजू शेट्टीं आंदोलन केले. पण आताचे पंचनामे हे एचडीआरएफच्या नियमाने सुरु आहेत. या नियमांमध्ये बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे जास्त नूकसान झाले आहे. त्यांना जास्त मदत देण्याची भूमिका सरकारची आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, हे निश्‍चितपणे सांगता येईल, असेही श्री पाटील यांनी नमूद केले. या मोर्चात श्री. शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. शेट्टी महाविकास आघाडी सोडून बाजूला जाणार नाहीत, असा विश्‍वास श्री पाटील यांनी व्यक्त केला.

जलसमाधी आंदोलन टाळावे

श्री. शेट्टी महाविकास आघाडीपासून लांब जात नाहीत. तर ते लोकांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना लवकर नूकसान भरपाई मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. आम्हीही तोच प्रयत्न करत आहे. त्यामुळे, श्री शेट्टी यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, कारण अजूनही पंचनामे सुरु आहे. नूकसान झालेल्या क्षेत्राची मूळ आकडेवारी आली पाहिजे. पहिल्यांदा 62 हजार हेक्‍टरवर होती. आज तोच आकडा 70 हजार हेक्‍टरपर्यंत गेला आहे. त्यामुळे, नूकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी पंचनाम्याची आकडे वारी आल्यानंतर सर्वांना नूकसान भरपाई देता येणार आहे. त्यामुळे श्री. शेट्टी यांनी काही वेळ द्यावा आणि जलसमाधी आंदोलन थांबवावे, असेही आवाहन श्री पाटील यांनी केले.

पाटील - महाडिक वाद 
पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक एकत्र येण्यामध्ये काही लोक अडचण निर्माण करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी याबद्दल चंद्रकांत पाटील यांनाच माहिती आपण त्यावर काहीही भाष्य करु शकत नाही. भाजने लसीकरणासाठी आग्रह धरावा भाजपने शंभर टक्के लसीकरणासाठी आग्रही राहून आंदोलन करावे. लसीकरण झाल्यानंतर मंदिर उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ज्यांचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख