खासदार उदयनराजे म्हणतात राज्य सरकारकडे इच्छा शक्तीचा अभाव

प्रत्येकाला घर असले पाहिजे. चांगल्या प्रकारे जीवन जगता आले पाहिजे. ही या मागची आमची भावना आहे. पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांची भेट घेणार आहे. मुळात अशा प्रकल्पांसाठी पाठपुरावा करावा लागणे म्हणजे राज्य सरकारकडे इच्छा शक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे.
Satara will be made a smart, ideal city says MP Udayanraje Bhosale :
Satara will be made a smart, ideal city says MP Udayanraje Bhosale :

सातारा : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाबाबत पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणार आहोत. मुळात अशा प्रकल्पांसाठी पाठपुरावा करावा लागणे, म्हणजे राज्य सरकारकडे इच्छा शक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचे पिण्याचे पाणी, आरोग्य याला प्राधान्य असले पाहिजे. लवकरात लवकर या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.  

दरम्यान, सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेत सत्तेत येताना दिलेल्या वचननाम्यातील सर्व वचनांची पूर्तता केलेली आहेत. आगामी काळात होणाऱ्या हद्दवाढीमुळे सातारा शहरात आणखी अडीच लाख लोकसंख्येची भर पडणार आहे. त्यामुळे या लोकसंख्येला चांगल्या सुविधा देण्यासोबतच सातारा शहर स्मार्ट तसेच आयडीयल सिटी म्हणून ओळखली जाईल, या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

साताऱ्यातील पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे सातारा पालिकेकडे हस्तांतरण आणि माजगावकर माळ झोपडपट्टी येथे होणाऱ्या नुतन वास्तूची पहाणी आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.  उदयनराजे म्हणाले, सातारा विकास आघाडीची २००० मध्ये सातारा पालिकेत सत्ता आली. त्यावेळी आम्ही कचराकुंडी मुक्त व झोपडपट्टीमुक्त सातारा शहर या दोन घोषणा केल्या होत्या.

आता सातारा शहर कचरकुंडी मुक्त झाले आहे. तसेच झोपडपट्टी मुक्त शहरासाठी आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दोनशे कोटींचा प्रकल्प करत आहोत. यामध्ये दोन हजार लाभार्थींचा समावेश आहे. सातारा विकास आघाडी सत्ते नव्हती, त्यावेळी काहींनी उच्च न्यायालयातून आदेश काढून पोलिस संरक्षणात या सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला होता. पण ही बिचारी जाणार तरी कुठे, हा प्रश्न माझ्या मनात आला.

त्यावेळी आम्ही या लोकांची मदत करण्याचा निर्णय मी घेतला. या भावनेतून ही योजना आम्ही राबविली आहे. सर्व पालिका क्षेत्रात ही योजना लागू करणार आहोत. प्रत्येकाला घर असले पाहिजे. चांगल्या प्रकारे जीवन जगता आले पाहिजे. ही या मागची आमची भावना आहे. पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांची भेट घेणार आहे. मुळात अशा प्रकल्पांसाठी पाठपुरावा करावा लागणे म्हणजे राज्य सरकारकडे इच्छा शक्तीचा अभाव असल्याचे दिसत आहे.

राज्य सरकारचे पिण्याचे पाणी, आरोग्य याला प्राधान्य असले पाहिजे. लवकरात लवकर या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, आजपर्यंतची सर्व वचने आम्ही पूर्ण केलेली आहे. अजून भरपूर काही करण्याचा आमचा मानस आहे. हद्दवाढीनंतर दोन अडीच लाख लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे सातारा शहर स्मार्ट व आयडीयल सिटी म्हणून ओळखली जाईल, या दिशेने वाटचाल करणार आहोत.  

अनेक वर्षांपासून पोवईनाका परिसर महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असेल तेथे आठ रस्त्यांचा संगम होतो. मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून केवळ घोषणा झाल्या. निवडणूका आल्या की  घोषणा होत होत्या. सातारा विकास आघाडीने आजपर्यंत कधीही घोषणा केल्या नाहीत. आम्ही वचननामा काढला, आमच्या वचननाम्यातील सर्व गोष्टींची आम्ही पूर्तता केली आहे. या सार्थ आम्हाला आभिमान आहे.

त्यासाठी संपूर्ण सातारकरांचे योगदान मिळाला याचे आहे. साठ कोटींचा प्रोजेस्ट असून असा प्रोजेक्ट महाराष्ट्रात कुठेही नसेल. दीड किलोमीटर लांबीचा हा प्रोजेक्ट असून यामुळे वाहतूकीची कोंडी थांबली आहे. पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता आम्ही नाविण्यपूर्ण योजनेतून अडीच कोटींची मागणी केली आहे.

त्यास पालकमंत्र्यांनी होकार दिलेला आहे. पहिल्या टप्प्यात येथे ग्रॅनाईट बसविणार असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी नियोजन समितीतून पैसे मिळविणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत. आज ग्रेड सेपरेटर हस्तांतरण झाले आहे. साताऱ्याच्या वैभवात भर पडणारा हा प्रोजेक्ट झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकल्प आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com