सातारा अनलॉक : रविवारपासून दुकाने, मॉल, उपहारगृहे रात्री दहापर्यंत खुली राहणार 

जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील.विवाह सोहळ्यांसाठी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
Satara Unlock: Shops, malls, restaurants will be open till 10 pm from Sunday Satara Unlock: Shops, malls, restaurants will be open till 10 pm from Sunday
Satara Unlock: Shops, malls, restaurants will be open till 10 pm from Sunday Satara Unlock: Shops, malls, restaurants will be open till 10 pm from Sunday

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज आनलॉकचा नवा आदेश लागू केला. यामध्ये सर्व दुकाने, उपहारगृहे, जिम, योग सेंटर, स्पा, शॉपिंग मॉल रविवार (ता.१५) पासून रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घेणे बंधनकारक असल्याने आता सोशल डिस्टसिंगचे पालन करत ग्रामसभा घेण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. त्यामुळे गेली १५ महिने लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकलेल्या सातारकरांची सुटका झाली आहे. अनलॉक होत असताना सोशल डिस्टसिंगचे पालन तसेच मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झालेल्या जिल्ह्यात रात्री आठपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण सातारा जिल्ह्यात अनलॉक कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात अनलॉक जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. येत्या रविवार (ता. १५) पासून ही नवीन नियमावली लागू होणार आहे.

यामध्ये उपहारगृहे ५० टक्के क्षमतेच्या अटीच्या अधीन राहून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपहारगृहे व बारमध्ये प्रवेश करताना मास्कचा उपयोग अनिर्वाय आहे. येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यकआहे. दोन्ही मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले कर्मचारी व व्यवस्थापक यांना परवानगी असेल. बारमध्ये ग्राहकाची शेवटी मागणी रात्री नऊ पर्यंत घेता येणार असून पार्सल सुविधा २४ तास सुरू ठेवता येणार आहे.

सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॉशिअम, योग सेंटर, सलुन, स्पा तसेच इनडोअर स्पोर्टस्‌ना रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. सर्व शासकिय, निमशासकिय, बँक कर्मचारी, रेल्वे, पालिका कर्मचारी व व्यवस्थापन यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यायचे आहे. शासकिय व निमशासकिय कार्यालये नियमित सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालये २४ तास सुरू ठेवता येणार असून एका सत्रात एकुण कर्मचारी संख्येच्या २५ टक्केच उपस्थिती ठेवता येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील. विवाह सोहळ्यांसाठी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असेल. खुल्या प्रांगणात, लॉनवरी किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, बंदिस्त मंगल कार्यालयात, हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोनशे व्यक्तींची मर्यादा असणार आहे. दशक्रिया विधी, अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त ५० नागरीकांच्या उपस्थितीत परवानगी दिली
आहे. 

ग्रामसभांना परवानगी....
ऑगस्ट महिन्यात ग्रामसभांचे आयोजन न केल्यास ग्रामपंचायत अधिनियम कलम सात मधील तरतूदीनुसार संबंधित ग्रामपंचायतीच सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची प्रकरणे उद्‌भवू नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली आहे.

त्यासाठी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. हस्तांदोलन व धुम्रपान करण्यास मनाई केली आहे. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर राहिल याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सभे पूर्वी व नंतर ठिकाण सॅनिटाईझ करणे बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ग्रामसभा घेता येणार नाही. सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रात ग्रामसभा घेण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. 

आंतरराज्य प्रवास....

आंतरराज्य प्रवासासाठी लसीकरण पूर्ण केलेल्यांना बाहेरच्या राज्यातून परवानगी असेल, त्यांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. मात्र, अन्य प्रवाशांसाठी ७२ तासपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.   

हे बंद राहणार....
सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स 
सर्व धार्मिक स्थळे
वाढदिवस, राजकिय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रिडा स्पर्धा

.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com