सातारा अनलॉक; वेळेच्या मर्यादेत सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टारंट सोमवार ते शुक्रवार सुरु 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, बैठका, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्केच्या मर्यादेत परवानगी असेल. शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर सायंकळी चार वाजेपर्यंत सुरु राहतील.
Satara Unlock; All shops, hotels, restaurants open from Monday to Friday within the time limit
Satara Unlock; All shops, hotels, restaurants open from Monday to Friday within the time limit

सातारा : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar shingh यांनी आज नवी नियमावली जारी केली. त्यानुसार अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने व आस्थापना तसेच खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टारंट यांना ५० टक्के क्षमतेने सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व बाजार समिती सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील. यामध्ये केवळ घाऊक किरकोळ विक्रेत्यांनाच माल घेता येईल. कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीस बाजार समितीत प्रवेश नसेल. अत्यावश्यक दुकाने मात्र आठवडाभर वेळेच्या मर्यादेत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. Satara Unlock; All shops, hotels, restaurants open from Monday to Friday within the time limit

जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज नवे आदेश लगू केले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व प्रकारची दुकाने वेळेच्या मर्यादेत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभरर सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु ठेवता येतील. औषधे व मेडिकलची दुकाने रात्री आठवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे यासाठी आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी पाच ते नऊ यावेळेत परवानगी असणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, बैठका, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्केच्या मर्यादेत परवानगी असेल. शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर सायंकळी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. व्यायामशाळा, केश कर्तनायलये, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्केच्या क्षमतेने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परिवहन बसेस शंभर टक्के क्षमतेने चालु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मालवाहतूकीच्या वाहनांना तीन व्यक्तीसह प्रवासास परवानगी असेल.

रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना इ पास बंधनकारक असेल. 
जिल्ह्यातील सर्व बाजार समिती सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील. यामध्ये केवळ घाऊक किरकोळ विक्रेत्यांनाच माल घेता येईल. कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीस बाजार समितीत प्रवेश नसेल.ऑनलाइन शिक्षणास परवानगी असून वैद्यकिय महाविद्यालयाचे नर्सिंग कोर्सेस सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. शासकिय व निम शासकिय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. जिल्ह्यात आठवड्याच्या सर्व दिवस सकाळी पाच ते सायंकाळी पाच यावेळेत जमावबंदी व सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचार बंदी लागू असणार आहे. 

हे बंद राहिल... 
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 
मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे 
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रार्थना स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे 
प्रतिबंधित क्षेत्रात सर्व कार्यक्रम
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com