साताऱ्याला मिळाले कोविड लसीचे 30 हजार डोस; शनिवारपासून लसीकरण

प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातील. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल.'' कोरोनाबाधितांना उपचार पूर्ण झाल्यानंतर ही लस दिली जाईल, तसेच लस घेतल्यानंतर काहींना ताप येण्याची शक्‍यता आहे, असे डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
Satara received 30,000 doses of covid vaccine; Vaccination from Saturday
Satara received 30,000 doses of covid vaccine; Vaccination from Saturday

सातारा : कोविड संसर्गावरील लसीचे 30 हजार डोस सातारा जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरण उद्या  (शनिवार) पासून सुरू होत असून पहिल्या टप्प्यात 24 हजार 410 शासकीय व खासगी आरोग्य संस्थांतर्गत कर्मचाऱ्यांना विविध नऊ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
 
कोरोनाची लस जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. 

"कोरोना लस ही तीन टप्प्यात दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात पोलिस, सैन्य दल, हवाई दल, तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतरही नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे हे उपाय करावेच लागणार आहेत.

श्री. सिंह म्हणाले, ""नऊ ठिकाणी होणाऱ्या या लसीकरणात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, ग्रामीण रुग्णालय माण, ग्रामीण रुग्णालय खंडाळा, कृष्णा मेडिकल कॉलेज कऱ्हाड, मिशन हॉस्पिटल वाई येथे होईल आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्याची 30 मिनिटे पाहणी करण्याकरिता रुममध्ये ठेवण्यात येणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातील. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल.'' कोरोनाबाधितांना उपचार पूर्ण झाल्यानंतर ही लस दिली जाईल, तसेच लस घेतल्यानंतर काहींना ताप येण्याची शक्‍यता आहे, असे डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. लसीचा विपरीत परिणाम झाल्यास एईएफआय किट प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेल, तसेच काही त्रास जाणवल्यास त्यांना जिल्हा रुग्णालय किंवा कृष्णा हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. 


नागरिकांनी काळजी घ्यावी 

सर्वसामान्यांना तिसऱ्या टप्प्यात लसीकरण होईल. त्यासाठी नोंदणीची गरज नाही. ही लस निःशुल्क असेल; पण लस घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा कोरोना होणार नाही, असे समजू नये, असे सांगून शेखर सिंह म्हणाले, ""नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी आवश्‍यक ती काळजी घ्यावी. ही लस 18 वयोगटाखालील मुले, ॲलर्जी असलेली व्यक्ती, गर्भवती महिलांना दिली जाणार नाही.'' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com