साताऱ्यात राजे समर्थक भिडले; सहाजण गंभीर जखमी

शांतता कमिटीच्या बैठकीत एसपींनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या सूचना देऊन काही तास उलटत नाहीत तोच सातारा शहरात दोन राजांच्या समर्थकांच्या गटात बुधवारी सायंकाळी धुमश्चक्री झाली.
साताऱ्यात राजे समर्थक भिडले; सहाजण गंभीर जखमी
In Satara, the Raje's supporters clashed; Six seriously injured

सातारा : नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयासमोर वाहन लावल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा शहरातील समर्थकांत काल रात्री धुमश्चक्री उडाली. यामध्ये नगरसेवक बाळासाहेब खंदारे व सनी भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांत झालेल्या या मारामारीत सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा शहर पोलिसांनी तब्बल १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. In Satara, the Raje's supporters clashed; Six seriously injured

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुवव्यवस्था चोख राहावी यासाठी बुधवारी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांसह शांतता कमिटीची बैठक येथील पोलिस करमणुक केंद्र येथे घेतली. या बैठकीत एसपींनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या सूचना देऊन काही तास उलटत नाहीत तोच सातारा शहरात दोन राजांच्या समर्थकांच्या गटात बुधवारी सायंकाळी धुमश्चक्री झाली. 

खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लागवली होती. त्यातून या नगरसेवकांच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गँग बोलावून तेथेच राडा केला. या राड्यात सहाजण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून मारामारीत सहभागी असलेल्यां १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in