संभाजीराजेंनी अशी केली श्रीनिवास पाटलांच्या पाहूणचाराची परतफेड.... - Sambhaji Raje Chhatrapati had invited NCP MP from Satara Srinivas Patil for dinner at his residence today. | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजेंनी अशी केली श्रीनिवास पाटलांच्या पाहूणचाराची परतफेड....

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

या भोजनावेळी खासदार पाटील यांच्याकडून असे अनेक अनुभवी राजकीय, सामाजिक किस्से ऐकायला आनंद वाटला. जेवण किंवा पाहुणचार हे निमित्त आहे, पण यानिमित्ताने खूप काही शिकायला मिळत असतं, ती संधी मी सोडत नाही. यातून सर्वपक्षीय खासदारांशी मैत्रीचे नाते तयार होत आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

सातारा : संसदीय समितीत अभ्यास दौऱ्यावर असताना संभाजीराजे छत्रपती सिक्कीमला मुक्कामी राहिले होते. त्यावेळी तत्कालिन राज्यपाल श्रीनिवास पाटलांच्या निवासस्थानी भेट देण्याचा त्यांना योग आला. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांनी त्याचा अविस्मरणीय असा पाहुणचार केला होता. आज दिल्लीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना आपल्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित करून त्या पाहूणचाराची परतफेड केली. यावेळी दोघांनीही पुढील आठवड्यात (११ फेब्रुवारीला) असेलल्या दोघांच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपल्या निवासस्थानी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, फौजिया खान, वंदनाताई चव्हाण उपस्थित होत्या.

यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी सिक्किमच्या दौऱ्यावर असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डोकलामचा विवादित प्रश्न समजून घेण्यासाठी पूर्वोत्तर राज्यांच्या संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यात असताना मी सिक्कीमला मुक्कामी होतो. तेंव्हा सिक्कीमचे राज्यपाल असलेल्या श्रीनिवास पाटलांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

त्यावेळी श्री. पाटील यांनी माझा अविस्मरणीय असा पाहुणचार केला होता. सिक्कीम राज्याबाबत त्यांचा गाढा अभ्यास पाहून आम्ही थक्क झालो होतो. तेथील आजपर्यंतचे सर्वात लोकप्रिय राज्यपाल म्हणून त्यांचा लौकिक झाला होता.

या भोजनावेळी खासदार पाटील यांच्याकडून असे अनेक अनुभवी राजकीय, सामाजिक किस्से ऐकायला आनंद वाटला. जेवण किंवा पाहुणचार हे निमित्त आहे, पण यानिमित्ताने खूप काही शिकायला मिळत असतं, ती संधी मी सोडत नाही. यातून सर्वपक्षीय खासदारांशी मैत्रीचे नाते तयार होत आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख