आघाडी सरकारवरील टीकेने शंभूराज देसाई संतापले; म्हणाले सदाभाऊ समोरा समोर या... - Sadabhau Khot should come face to face: Minister Shambhuraj Desai's challenge | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडी सरकारवरील टीकेने शंभूराज देसाई संतापले; म्हणाले सदाभाऊ समोरा समोर या...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 21 मे 2021

शंभूराज देसाई म्हणाले, मला या गोष्टीची किव येते की कृषी खात्याचे राज्यमंत्री पद सदाभाऊ खोत यांनी सांभाळलेले आहे. त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे योग्य नाही. सर्वात मोठी कर्जमूक्तीची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकाने राबविली आहे.

सातारा : कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले होते. त्याच पक्षाचे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. सदाभाऊ खोतांनी (Sadabhau Khot) समोरा समोर यावे, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात किती मदत झाली. यावर समोरा समोर येऊन चर्चा करण्यास महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून मी तयार आहे, असे आव्हान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  (Shambhuraj Desai) यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिले आहे. (Sadabhau Khot should come face to face: Minister Shambhuraj Desai's challenge)

भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारने चक्रीवादळात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी त्यांना समोरा समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. 

हेही वाचा : देशात डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय राजीव गांधींच्या दूरदृष्टीलाच.

शंभूराज देसाई म्हणाले, मला या गोष्टीची किव येते की कृषी खात्याचे राज्यमंत्री पद सदाभाऊ खोत यांनी सांभाळलेले आहे. त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे योग्य नाही. सर्वात मोठी कर्जमूक्तीची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकाने राबविली आहे.

आवश्य वाचा : परमबीर सिंग खुनशी अन् भ्रष्टाचारी! पोलिस निरीक्षक घाडगे सर्वोच्च न्यायालयात

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. यातून २२ हजार कोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. विविध वादळे असून देत किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो झालेल्या नुकसानी बद्दल राज्य सरकरच्या तिजोरीतून मदत करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. उलट कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कोणी केले, असा प्रश्न उपस्थित केला.

 मंत्री देसाई म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने खतांची दरवाढ केली. त्याच पक्षाचे सदाभाऊ खोत महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी समोरा समोर यावे, महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात शेतकऱ्यांना किती मदत झाली, याची समोरा समोर येऊन चर्चा करण्यास मी तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख