The rift between Minister Vishwajit Kadam and MLA Gore persisted even after the defection
The rift between Minister Vishwajit Kadam and MLA Gore persisted even after the defection

विश्वजित कदम आणि आमदार गोरे यांच्यातील जिव्हाळा पक्षांतरानंतरही कायम

या दौर्‍यात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी जुना जिव्हाळा असलेली, तनाने काँग्रेसमध्ये अन्‌ मनाने आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत असलेली बरीच मंडळी उपस्थित होती. यापैकी अनेकजण काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदांवर कार्यरत आहेत.

दहिवडी : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या माण तालुका दौर्‍यात आमदार जयकुमार गोरे यांच्याशी असलेला त्यांचा जुना जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. दोघांनी एकाच गाडीतून केलेला प्रवास बरंच काही सांगून गेला. 

विश्वजित कदम यांनी माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या दौर्‍यादरम्यान माणचे आमदार जयकुमार गोरे त्यांच्यासोबत होते. विश्वजित कदम हे काँग्रेसमध्ये असून आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत. मात्र, यापुर्वी ते काँग्रेसमध्ये होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना आमदार गोरे व कदम घराण्याची चांगलीच सलगी होती. आमदार गोरे हे स्वर्गीय पतंगराव कदम यांना राजकीय गुरु मानतात. आमदार गोरे यांच्या राजकीय जडणघडणीत स्वर्गीय पतंगराव कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. या पहाणी दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही घराण्यातील स्नेह दिसून आला. पक्ष जरी वेगळे असले तरी स्नेह कायम असल्याचे अधोरेखीत झाले.

एका गाडीतून प्रवास करताना सोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव ही उपस्थित होते. या दौर्‍यात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी जुना जिव्हाळा असलेली, तनाने काँग्रेसमध्ये अन्‌ मनाने आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत असलेली बरीच मंडळी उपस्थित होती. यापैकी अनेकजण काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदांवर कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com