शाहू महाराजांच्या (थोरले) समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन : राजमाता कल्पनाराजे - Revival of history due to restoration of Samadhi of Shahu Maharaj (Thorale) says Rajmata Kalpanaraje | Politics Marathi News - Sarkarnama

शाहू महाराजांच्या (थोरले) समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन : राजमाता कल्पनाराजे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

 मूळ समाधीस धक्का न लावता, त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने या समाधीचा जिर्णोद्धार करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या  पुण्यतिथीदिवशी आज सकाळी अकरा वाजता संगम माहुली येथे जीर्णोद्धारीत समाधी लोकार्पण सोहळा राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. 

सातारा : संगममाहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जीर्णोद्धारीत समाधीचे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाल्याची प्रतिक्रिया राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिली.

 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी पूर्ण केले. स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथील रंगमहालात निधन झाले होते.

त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याचठिकाणी समाधी उभारण्यात आली होती. या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्याचा संकल्प साताऱ्यातील इतिहासप्रेमींनी सोडला. त्यानुसार या कामास ऑक्‍टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली.

मूळ समाधीस धक्का न लावता, त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने या समाधीचा जिर्णोद्धार करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या  पुण्यतिथीदिवशी आज सकाळी अकरा वाजता संगम माहुली येथे जीर्णोद्धारीत समाधी लोकार्पण सोहळा राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी अजय जाधवराव, धिरेंद्र राजपुरोहित, अमर जाधवराव, शशिकांत पवार, अविनाश कोळपे, निरज झोरे, संदीप शिंदे, विलास माने, रंजना रावत, गीतांजली कदम, तसेच साताऱ्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. या समाधीच्या जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाले असून, यामुळे साताऱ्याच्या वैभवात भर पडल्याचे मत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केले. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख