सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर ठराव; दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश

आता कच्ची मतदार यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या १२ तारखेला कच्ची मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन मगच अंतिम मतदार यादी पाच एप्रिलला प्रसिद्ध केली जाणार आहे.
Resolution over 2,000 for Satara District Bank; Includes names of veterans
Resolution over 2,000 for Satara District Bank; Includes names of veterans

सातारा : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह इतर मतदारसंघांतून ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहा मतदारसंघांसाठी ११ तालुक्‍यांतून विद्यमान आमदार, खासदारांसह दिग्गज नेत्यांचे तब्बल २०१३ ठराव करण्यात आले आहेत. येत्या १२ मार्चला कच्ची मतदार यादीची प्रसिद्धी होईल. त्या वेळीच नेमके कोणाचे कोठून व किती ठराव आलेत हे समजणार आहे. त्यानंतर मतदार यादीवर हरकती, सुनावणी होऊन पाच एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम १५ मेच्या दरम्यान सुरू होणार आहे. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा बॅंकेकडून कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच कोणाचे किती ठराव झाले समजणार आहे. सध्या उपनिबंधक कार्यालयाने सोसायटींसह इतर पाच मतदारसंघांतून ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये एकूण २०१३ ठराव प्राप्त झाले आहेत.

यामध्ये ११ तालुक्‍यांतून सोसायट्यांतून ९६४, नागरी बॅंका, पतसंस्थांतून ३८०, गृहनिर्माणमधून ३०७, औद्योगिक विणकरमधून ३२१, खरेदी- विक्री संघातून ११, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून ३० ठरावांचा समावेश आहे. सर्वाधिक ठराव सातारा तालुक्‍यातून आहेत. 

सोसायटी मतदारसंघातून आलेले तालुकानिहाय ठराव असे : सातारा 146, कऱ्हाड 145, वाई 59, पाटण 105, महाबळेश्‍वर 11, जावळी 51, खटाव 103, माण 74, कोरेगाव 90, खंडाळा 51, फलटण 129. नागरी बॅंका मतदारसंघासाठी : सातारा 94, कऱ्हाड 70, वाई 31, पाटण 29, महाबळेश्‍वर 14, जावळी सात, खटाव 18, माण 24, कोरेगाव 21, खंडाळा
15, फलटण 57.

गृहनिर्माणमधून सातारा 122, कऱ्हाड 67, वाई 15, पाटण 45, महाबळेश्‍वर 14, जावळी तीन, खटाव चार, माण चार, कोरेगाव नऊ, खंडाळा नऊ, फलटण 15. औद्योगिक विणकर संस्थेतून सातारा 79, कऱ्हाड 48, वाई 24, पाटण 32, महाबळेश्‍वर नऊ, जावळी आठ, खटाव 23, माण 16, कोरेगाव 10, खंडाळा 12, फलटण 60.

खरेदी- विक्री संघ : सातारा दोन, महाबळेश्‍वर शून्य व उर्वरित तालुक्‍यातून प्रत्येकी एक ठराव. कृषी प्रक्रिया मतदारसंघ : सातारा आठ, कऱ्हाड पाच, वाई दोन, पाटण व महाबळेश्‍वर प्रत्येकी एक, जावळी तीन, खटाव एक, माण व कोरेगाव शून्य, खंडाळा एक, फलटण आठ. हे सर्व ठराव जिल्हा बॅंकेकडे सुपूर्द करण्यात आले असून, आता कच्ची मतदार यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या १२ तारखेला कच्ची मतदारयादी प्रसिद्ध केली
जाणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन मगच अंतिम मतदार यादी पाच एप्रिलला प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अशी आहे स्थिती 

तालुकानिहाय आलेले एकूण ठराव असे : सातारा 451, कऱ्हाड 336, वाई 132, पाटण 213, महाबळेश्‍वर 49, जावळी 73, खटाव 150, माण 119, कोरेगाव 131, खंडाळा 89, फलटण 270. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com