महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवेंद्रसिंहराजे आक्रमक; दुरूस्ती करा; अन्यथा, टोल वसुली बंद करा
Repair highways; Otherwise, stop toll collection says MLA Shivendrasinharaje

महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवेंद्रसिंहराजे आक्रमक; दुरूस्ती करा; अन्यथा, टोल वसुली बंद करा

या खड्ड्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून लहान वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून अपघात होऊन दुचाकी स्वारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

सातारा : सातारा- पुणे महामार्गावची दूर्दशा झाली असून याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महामार्ग तातडीने दुरस्ती करावी, जोपर्यंत दुरस्‍्‍ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, अशी मागणी भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले की, सध्या महामार्गाची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. 

या खड्ड्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून लहान वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून अपघात होऊन दुचाकी स्वारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाची तातडीने दुरूस्ती करावी. याबाबत संबंधित ठेकेदाराने तातडीने कार्यवाही करावी. जोपर्यंत महामार्गाची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in