वन्यजीव विभागाचा गलथानपणा; 'सह्याद्री'तील मळे, कोळणे, पाथरपुंजचे पुनर्वसन रखडले

पुर्नवसनाबाबत यंत्रणेत ताळमेळ नाही. असा गंभीर आरोप यावेळी समिती सदस्यांनी केला. गावातील बहुतांशी लोक मुंबईला आहेत. चाकरमान्यांची शहराकडे वापसी मे महिन्यात होते आणि वन्यजीव विभाग सक्रीय होतो. मात्र दिवाळी संपली की हा विभाग झोपतो त्यामुळे पुर्नवसन प्रलंबित राहिले आहे. याबात अनेक आंदोलने विनंती अर्ज केले परंतु कोणतीही दाद घेतली जात नाही.
Rehabilitation of three villages in the core zone of Sahyadri Tiger Project stalled
Rehabilitation of three villages in the core zone of Sahyadri Tiger Project stalled

पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मळे, कोळणे व पाथरपुंज गावाचे पुर्नवसन वन्यजीव विभागाच्या गलथान कारभारामुळे रखडले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित नऊ मागण्यांसंदर्भात प्रशासनाच्या उदासिनतेबाबत कोळणे येथील व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षण कुटी शेजारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मळे, कोळणे व पाथरपुंज पुर्नवसन कृती समितीच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने पाटण येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

5 जानेवारी 2010 रोजी शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये कोयना विभागातील मळे कोळणे व पाथरपुंज गावे येत असून वन्यजीव विभागाच्या कात्रीत ही गावे कशी सापडलीत याचा पाढा समिती सदस्यांनी मांडला.

यावेळी पसंत असणाऱ्या जमिनींचे तात्काळ वाटप करणे, संकलन यादीतील त्रुटी जागेवर दुरुस्त करुन देणे, मालमत्ता मुल्यांकनाबाबत पुर्नवसन समितीने मान्यता देणे, शिल्लक मुल्यांकन पुर्ण करणे, पारंपारिक हक्क अबाधित ठेवणे, एकाचवेळी पॅकेजचा मोबदला मिळावा, प्रपत्र ब यादीसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी धरणे, या गावांसाठी असणारा रेडिरेकनरचा दर कमी असून त्यामध्ये वाढ करावी, तात्काळ पुर्नवसन करता येत नसेल तर मोडकळीस आलेल्या घरांच्या बांधणीस मान्यता देणे आणि पुर्नवसन प्रक्रिया वेगात राबविणे अशा मागण्यांचा समावेश आहे.

पुर्नवसनाबाबत यंत्रणेत ताळमेळ नाही. असा गंभीर आरोप यावेळी समिती सदस्यांनी केला. गावातील बहुतांशी लोक मुंबईला आहेत. चाकरमान्यांची शहराकडे वापसी मे महिन्यात होते आणि वन्यजीव विभाग सक्रीय होतो. मात्र दिवाळी संपली की हा विभाग झोपतो त्यामुळे पुर्नवसन प्रलंबित राहिले आहे. याबात अनेक आंदोलने विनंती अर्ज केले परंतु कोणतीही दाद घेतली जात नाही.

त्यामुळे 25 जानेवारी पासुन कोळणे येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षण कुटी शेजारी तीन गावचे ग्रामस्थांनी कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करणार आहेत. जागेवर तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल असा इशारा समिती सदस्यांनी दिला आहे. यावेळी कृती समितीचे संजय कांबळे, संजय पवार, दीपक कांबळे, भरत चाळके, प्रकाश जाधव, अशोक कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com