रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी स्वखर्चातून उभारले शंभर बेडचे कोविड सेंटर; उद्या चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्‌घाटन

कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा स्टाफ, आवश्यक औषधे व ऑक्सिजनची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.
Ranjitsinh Naik Nimbalkar built a hundred bed covid center at his own expense
Ranjitsinh Naik Nimbalkar built a hundred bed covid center at his own expense

फलटण शहर : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या प्रयत्नातून फलटण येथे सुरु होत असलेल्या 'लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर कोविड केअर सेंटरचा' प्रारंभ भाजपचे (Bhartiya Janata Party) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्या (बुधवारी) होणार आहे. या सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड व 50 विलगीकरणाचे बेड असे एकुण शंभर बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे कोविड केअर सेंटर (Corona Care Centre) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वखर्चातून उभारले आहे. (Ranjitsinh Naik Nimbalkar built a hundred bed covid center at his own expense)

फलटण शहरात मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील उत्कर्ष लॉज येथे हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. उद्या (बुधवार) सायंकाळी पाच वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन या सेंटरचा शुभारंभ होणार आहे.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, फलटण नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव उपस्थित राहणार आहेत. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर कोविड केअर सेंटरमध्ये 50 ऑक्सिजनचे बेड व 50 विलगीकरणाचे बेड असे एकंदरीत शंभर बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर कोविड केअर सेंटर खासदार निंबाळकर यांनी स्वखर्चातून उभारले आहे. कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा स्टाफ, आवश्यक औषधे व ऑक्सिजनची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा व जेवणाची सुविधा ही पुर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com