रामाची नियत खराब होती..., जयकुमारची नाही...! - Rama's destiny was bad ..., not Jayakumar's ...! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

रामाची नियत खराब होती..., जयकुमारची नाही...!

संजय जगताप
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021

आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून देत रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली.

मायणी : रामाची नियत खराब होती, जयकुमारची नियत खराब नाही. त्यामुळे मी जिंकलो आहे, असे वादग्रस्त वक्तव्य माण खटाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे.  वडूज (ता. खटाव) परिसरातील सातेवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाशिव खाडे, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. Rama's destiny was bad ..., not Jayakumar's ...!

राजकीय जय पराजयाबाबत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी एका पत्रकाराचा हवाला देत रामायणातील दाखला दिला. श्री. गोरे म्हणाले, लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा.

हेही वाचा : अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडलं पण त्याआधी केलं मोठं काम...

त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो, असे सांगून  आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे. कारण रामाची नियत खराब होती. रामाची नियत खराब होती. आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून देत रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली. मात्र, गोरे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे श्री राम भक्तांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. आमदारांना रामायण ही माहित नाही काय, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.  

आवश्य वाचा : भाजपला गळती; दोन दिवसांत दोन आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख