गोरेंना रोखण्यासाठी माण-खटावच्या नेत्यांसोबत रामराजेंची चर्चा - Ramaraj's discussion with the leaders of Maan-Khatav to stop Gore | Politics Marathi News - Sarkarnama

गोरेंना रोखण्यासाठी माण-खटावच्या नेत्यांसोबत रामराजेंची चर्चा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

यावेळी सुमारे तासभर या नेत्यांशी रामराजेंनी चर्चा केली. माण-खटावमधील राजकिय हालचाली, पाणी प्रश्नासह भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीची रणनिती यावेळी ठरविण्यात आली. या सर्व खलबतांमुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 

सातारा : माण, खटाव मतदारसंघातील भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आज दुपारी सातारा शासकिय विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार जयकुमार गोरेंना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीची रणनिती ठरविण्यात आली.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू असून मार्चमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे आगामी एक महिन्यात मी जिल्हा बँकेविषयी खळबळ जनक गोष्ट घडविणार असल्याचे रामराजेंनी सांगितले. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात थांबले होते. दुपारी माण-खटाव तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी रामराजेंची भेट घेतली. यामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, बॅंकेचे संचालक अनिल देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळेंसह इतर नेते मंडळी उपस्थित होती.

यावेळी सुमारे तासभर या नेत्यांशी रामराजेंनी चर्चा केली. माण-खटावमधील राजकिय हालचाली, पाणी प्रश्नासह भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीची रणनिती यावेळी ठरविण्यात आली. या सर्व खलबतांमुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख