इंधन दरवाढ विरोधात जनतेत आवाज उठवा : पवारांनी केले आवाहन
Raise voice in public against fuel price hike: Pawar appeals

इंधन दरवाढ विरोधात जनतेत आवाज उठवा : पवारांनी केले आवाहन

तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने काही प्रश्न निश्चित समोर येतात. त्यावर सरकार तोडगा काढेल.

मुंबई : सतत पेट्रोल, डिझेल आणि स्वयपांक गॅसच्या दरात वाढ होत आहे. या वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेसमोर जायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. मात्र, जनतेसमोर जाताना कोविड च्या नियमाचे तंतोतंत पालन करावे, असेही पवार म्हणाले. Raise voice in public against fuel price hike: Pawar appeals

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील बैठकीत ते बोलत होते.
 यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि पराभूत उमेदवारांनी राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्याबाबत नाराजी व्यक्त करताना मतदार संघातील अनेक समस्यांबाबत शरद पवार यांना अवगत केले. 

राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नावर जरूर निर्णय होतील. पण काही प्रश्न केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झाले आहेत. तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने काही प्रश्न निश्चित समोर येतात.  त्यावर सरकार तोडगा काढेल. मात्र केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर पक्षाने जनतेत जावून भूमिका मांडायला हवी, असे निर्देश शरद पवार यांनी दिले.

ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार...

स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाने निर्बंध आले असले तरी ओबीसींच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 
ओबीसी आरक्षणावर जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत निवडणूका होवू नयेत, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. त्यासाठी अनेकजण सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला तर निवडणूका रोखता येणार नाहीत, असेही पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in