बॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....

शासकीय यंत्रणेने नुकसानग्रस्ताचे पंचनामे तातडीने पूर्ण करून लोकांना मदत मिळवून द्यावी. लोकांना मदत मिळण्यासाठी काही मदत लागल्यास मी स्वतः लक्ष घालेन.
Provide cash assistance to flood victims without bank accounts: Prithviraj Chavan's demand
Provide cash assistance to flood victims without bank accounts: Prithviraj Chavan's demand

कऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी प्रयत्न करत आहे. बाधितांच्या बॅंक खात्यावर भरपाईची रक्कम जमा होणार आहे. मात्र, बँकेत खाते नाही, अशा बाधितांना शासनाने मदतीची रोख रक्कम द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. Provide cash assistance to flood victims without bank accounts: Prithviraj Chavan's demand

कऱ्हाड तालुक्यातील काले, नांदगाव, उंडाळे, टाळगाव, येळगाव, बांदेकरवाडी, कोळे, आणे, येणके, पोतले भागांतील नुकसानग्रस्त भागाची आमदार चव्हाण यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही आमदार चव्हाण यांनी संवाद साधला. 

श्री. चव्हाण म्हणाले, ''राज्य मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतला आहे, तो ज्यांची बँक खाती आहेत. त्यांना थेट मदत देण्यास काहीच अडचण नाही. मात्र, ज्यांची बँक खाती नाहीत. त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे. शासकीय यंत्रणेने नुकसानग्रस्ताचे पंचनामे तातडीने पूर्ण करून लोकांना मदत मिळवून द्यावी. लोकांना मदत मिळण्यासाठी काही मदत लागल्यास मी स्वतः लक्ष घालेन.''

या भागातील बाधितांना मदतीचे वाटप केले. अधिकाऱ्यांना बाधित लोकांना लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचनाही दिल्या. या वेळी ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, नानासाहेब पाटील, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, राहुल चव्हाण उपस्थित होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com