जादा लसीकरण केंद्रांसाठी केंद्राकडे प्रस्ताव; पालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीत सुविधा होणार  

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती आदी ठिकाणी नागरिक, ग्रामस्थ यांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावित केले आहे.सातारा शहरात दररोज सरासरी प्रत्येक केंद्रावर 300 व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे.
Proposals to the Center for additional vaccination centers; There will be facilities in Palika, Nagar Panchayat, Gram Panchayat
Proposals to the Center for additional vaccination centers; There will be facilities in Palika, Nagar Panchayat, Gram Panchayat

सातारा : केंद्र शासनाने एक मेपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसंख्येचा विचार करता सातारा शहरात तीन ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याबरोबरच जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि मोठया ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रात नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याचे जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावित केले आहे. लवकरच ही लसीकरणाची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातुन करण्यात येईल, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सध्या जगभरासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सुदैवाने भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली असून, सर्व प्रथम कोरोना फ्रंट वॉरिअर्स व त्यानंतर 45 आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास प्राधान्य दिले होते. आता केंद्राने एक मे म्हणजेच महाराष्ट्र व कामगार दिनापासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण करावयाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन लसीकरण केंद्र सुध्दा वाढवावी लागणार आहेत.

त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती आदी ठिकाणी नागरिक, ग्रामस्थ यांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावित केले आहे. सातारा शहरात दररोज सरासरी प्रत्येक केंद्रावर 300 व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे.

या केंद्रावर लसीकरण करुन घेण्यासाठी येणा-या नागरीकांची बैठक व्यवस्था,‍ पिण्याच्या पाण्याची सोय, तातडीच्या वैद्यकीय प्रथमोपचारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच सातारा शहरातील सदरबझार येथील दगडी शाळा, शाहुपूरी ग्रामपंचायत इमारत या नवीन जादा ठिकाणांसह संपूर्ण जिल्हयातील नगरपालिका, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती येथे केंद्र सरकारच्या मंजूरीप्रमाणे नवीन लसीकरण केंद्र सुरु करुन 18 वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाची सुलभ व्यवस्था करण्यात येईल, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com