रितसर परवानगीनेच मदत; रा. स्व. संघाची बदनामी करण्याच्या हेतूने काहींचे षड्यंत्र..... 

जीव धोक्यात टाकून येणाऱ्यांना स्वंयसेवक मदत करत होते. प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीत शासनाच्या संघ मदतीला असतो. तसाच यावेळीही मदतीला आलाय 18 ते 44 वयोगटातील नागरीकांची संख्या पाहता लसीकरण केंद्रांवर शासनाच्या मदतीसाठी सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक काम करत होता. तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश शिंदे यांची परवनागी घेतली होती.
रितसर परवानगीनेच मदत; रा. स्व. संघाची बदनामी करण्याच्या हेतूने काहींचे षड्यंत्र..... 
Proper permission only helped; Conspiracy to discredit Swayamsevak Sangh .....

कऱ्हाड : कोरोनाच्या (Coroan) आव्हानात्मक काळात शासकीय अधिकारी, सरकारी रुग्णालयातील डॉकटर्स, परिचारकांसह अन्य कोविड योद्धांना मदत व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात (Venutai Chavan Sub-District Hospital) शासनाची रितसर परवानगी मदत करत आहेत. त्याबाबत चुकीची माहिती पसरवून संघाच्या बदनामीचा कट केला जातो आहे, तो चुकचा आहे, अशी माहिती संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे  (Shrikant Ekande) व संदीप कुलकर्णी (Sandip Kulkarni) यांनी दिली आहे. (Proper permission only helped; Conspiracy to discredit Swayamsevak Sangh)

युवक काँग्रसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी उपजिल्हा रूग्णालयातील संघाच्या मदतीवर हरकत घेत त्यांची तक्रार केली. उपजिल्हा
रूग्णलायात जावून त्यांनी हरकत नोंदवली. त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधीक्षकांकडे केली. त्यावर  संघाने खुलासा केला. संघाचे कार्यवाह श्री. कुलकर्णी व श्री. एकांडे यांनी केलेला खुलासा असा की, संघाने शासनाची परवानगी घेवून लसीकरण केंद्रावर शुक्रवारपासून (ता. 7) मदतकार्य सुरू होते.

लसीकरण केंद्र सहायता कक्ष, नावनोंदणी, ज्येष्ठांना सहकार्य, गर्दीवर नियंत्रण आदी कामे तेथे केली. जीव धोक्यात टाकून येणाऱ्यांना स्वंयसेवक मदत करत होते. प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीत शासनाच्या संघ मदतीला असतो. तसाच यावेळीही मदतीला आलाय 18 ते 44 वयोगटातील नागरीकांची संख्या पाहता लसीकरण केंद्रांवर शासनाच्या मदतीसाठी सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक काम करत होता. तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश शिंदे यांची परवनागी घेतली होती.

मात्र खोडसाळपणे समाजामध्ये संघाची बदनामी करण्याच्या हेतूने काहींनी षड्यंत्र करत त्याची तक्रार केली. स्वयंसेवकांची लसीकरण केंद्रावर शासनावरील ताण हलका होण्यास निश्चितच मदत झाली होती. स्वयंसेवाकांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान केले होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत होता. स्वयंसेवकांची नागरीकांशी वाद झाला असे त्यांचे म्हणणे कपोलकल्पित आहे. संघ स्वयंसेवक समाजाच्या मदतीला धावून आलेला पाहून त्यांची पोटदुखी झाली. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेली बदनामीची कृती निषेधार्थ आहे. माध्यमांनाही धादांत खोटी
माहिती सांगून बदनाची केली गेली ती चुकीची आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in