ताफा थांबवून पृथ्वीराज चव्हाणांनी केली अपघातातील जखमींना मदत

अपघात पाहून गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरून प्रथम मी जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती. प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आणि तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सुचना केल्या. त्यासाठी माझ्या ताफ्यातील गाडीतून जखमींना दवाखान्यात हालवले.
Prithviraj Chavan stopped the convoy and helped the injured
Prithviraj Chavan stopped the convoy and helped the injured

सातारा/कराड : काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तत्परतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन आज कराडकरांना पहायला मिळाले. एका लग्न समारंभाला जाताना सैदापूर कालव्याजवळ अपघात झालेला पाहून त्यांनी वाहनांचा ताफा थांबवला. अपघातातील जखमींना ताफ्यातील गाडीतून दवाखान्यात पाठविले. यासंदर्भात श्री. चव्हाण यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबतची माहिती टाकली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, आज सकाळी एका लग्न समारंभाला निघाले होते. त्यांचा ताफा सैदापूर कालव्याजवळ आल्यावर त्यांना वाटेत कालव्याजवळ अपघात झाल्याचे दिसले.

माझा गाड्यांचा ताफा त्याच मार्गावरून जात होता. अपघात पाहून गाड्यांचा ताफा थांबवला, गाडीतून खाली उतरून प्रथम मी जखमींची चौकशी केली. अपघातातील महिला अतिशय घाबरलेली होती. प्रथम जखमी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. आणि तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सुचना केल्या. त्यासाठी माझ्या ताफ्यातील गाडीतून जखमींना दवाखान्यात हालवले. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तत्परतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन कऱ्हाडकरांना पहायला मिळाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com