पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा... - Prithviraj Chavan Demands resignation of Amit shaha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 जुलै 2021

आसाम आणि मिझोरामच्या सीमावर्ती भागात सातत्याने संघर्ष होत आहे. त्यातून हिंसाचार घडत आहे. पूर्वोत्तर भागामधील शांतता भंग होऊ लागली आहे.

कऱ्हाड : आसाम आणि मिझोरामच्या सीमांवर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. Prithviraj Chavan Demands resignation of Amit shaha 

सोमवारी आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबार झाला. त्या घटनेत मुळचे पुण्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांचे दोन सुरक्षारक्षक पोलिसांसह काही पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्या घटनेवरून आमदार चव्हाण यांनी ट्विटवरून गृहमंत्री शहा यांच्यावर निशाना साधला. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली; गोळीबार सुरू असताना सहावेळा फोन केला...ते म्हणाले, सॉरी!

आमदार चव्हाण यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये आसाम आणि मिझोरामच्या सीमावर्ती भागात सातत्याने संघर्ष होत आहे. त्यातून हिंसाचार घडत आहे. पूर्वोत्तर भागामधील शांतता भंग होऊ लागली आहे. प्रथमच दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यात काहींना गंभीर इजा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आवश्य वाचा : युडियुरप्पांच्या गच्छंतीनंतर कर्नाटकात 'कमळ' फुलवणाऱ्या १६ नेत्यांवर टांगती तलवार
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख