कोरेगावच्या भरत नाळेंना राष्ट्रपती पदक जाहीर 

नाळे यांनी सातारा शहर, सातारा तालुका, कऱ्हाड शहर, मुख्यालयात सेवा बजावली आहे. ते सध्या कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांना या काळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल राष्ट्रपती उत्कृष्ट सेवापदक आज जाहीर झाले.
President's Medal announced to Bharat Nala of Koregaon
President's Medal announced to Bharat Nala of Koregaon

सातारा : जिल्हा पोलिस दलात उपनिरीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या भरत ज्ञानदेव नाळे यांना उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. नाळे हे कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सध्या कर्तव्यास आहेत. 

राज्यातील 57 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, त्याबाबतचे निवेदन केंद्रीय गृह विभागाच्या वतीने प्रसिध्द झाले आहे. राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा पोलिस दलातील नाळे यांचा समावेश आहे.

श्री. नाळे हे 1983 मध्ये पोलिस दलात शिपाईपदी भरती झाले होते. यानंतर त्यांना खात्यांतर्गत विविध पदांवर पदोन्नती मिळाली. 2013 रोजी खात्यांतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नाळे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली.

नाळे यांनी सातारा शहर, सातारा तालुका, कऱ्हाड शहर, मुख्यालयात सेवा बजावली आहे. ते सध्या कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांना या काळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल राष्ट्रपती उत्कृष्ट सेवापदक आज जाहीर झाले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोरेगाव हे नाळे यांचे मूळ गाव आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com