राष्ट्रपतींकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटलांचा गौरव; राजदंडक भेट देत दिल्या दिर्घायुष्याच्या शुभेच्‍छा

राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांचे संवैधानिक कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. तसेच सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले.
President honors former Governor Srinivasa Patil; Wishing long life by visiting the scepter
President honors former Governor Srinivasa Patil; Wishing long life by visiting the scepter

कऱ्हाड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी राज्यपाल व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी पत्राद्वारे या शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती भवनाकडून कऱ्हाडच्या तहसिलदारांना शासकीय कार्यक्रमात पत्र व राजदंडक प्रदान करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकिय ध्वजवंदन कार्यक्रमात प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रपतींचे पत्र व राजदंडक प्रदान करण्यात आले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले की, राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांचे संवैधानिक कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. तसेच सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले.

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध दृढ करून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आपले अमूल्य योगदान यशस्वीरित्या देऊन आपण आपल्या पदापासून मुक्त झालात. ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. 
व्यक्तिमत्त्व, कृतज्ञता आणि विपुल अनुभवांनी समृद्ध असलेले तुम्ही नेहमीच समाज आणि देशासाठी प्रेरणेचे स्त्रोत राहाल.

तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छांसह भारतीय  प्रजासत्ताकचे सुसज्जित दंडक स्मृतिचिन्हाच्या रूपाने मी आपणास भेट देत आहे. राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन गणतंत्र दिवशी केलेल्या या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करीत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com