जीएसटी निधीचा दरेकरांचा मुद्दा अजित पवारांनी खोडून काढला....

पण कोरोनाच्या काळात राज्याचे उत्पन्नच कमी झाल्याने आड्यातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून त्यामुळे येत्या ३१ मार्चनंतर उर्वरित सगळे जीएसटीची पैसे परत येतील. सगळ्याची ओरड शांत होईल, असा होईल, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळे केंद्राला दोष देण्यापेक्षा मदत केल्याबद्दल साधी कृतज्ञताही कोणी व्यक्त करत नाही.
Praveen Darekar's issue of GST fund was erased by Ajit Pawar ....
Praveen Darekar's issue of GST fund was erased by Ajit Pawar ....

सातारा : महाराष्ट्राला केंद्राने सगळ्यात जीएसटीची रक्कम परत केल्याचा प्रवीण दरेकर यांचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडून काढत राज्याकडून केंद्राला जाणाऱ्या जीएसटीच्या निम्मा निधी परत मिळतो. पण २८ फेब्रुवारीअखेर केंद्राकडून महाराष्ट्राला ३२ हजार २९० कोटी रूपये येणे बाकी असल्याचे सांगितले. त्यावर दरेकरांनी कोरोना काळात उत्पन्नच नव्हते, त्यामुळे आडात नव्हते तर पोहऱ्यात येणार कुठे, असे सांगत म्हणूनच आपल्याला जास्त पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. 

विधान परिषदेच्या अर्थसंकल्पिय अधिवशेनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी भाई जगताप यांनी मोदींसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा आवाज, दाढी वाढली, गोलमटोल अशी विश्लेषणे लावून टीकेची झोड उठविली. त्याला दरेकर यांनी उत्तर देताना दुसऱ्याकडे बोट दाखविताना आपण काय केले हे
सांगण्यास भाई जगताप विसरल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

जीएसटीवरून केंद्र सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले, केंद्राने जीएसटीच्या माध्यमातून महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये परत दिलेले आहेत. केंद्राने आपली जबाबदारी पार पाडली आहे. तरीही जीएसटीवरून केंद्र सरकार व मोदींवर टीका केली जात आहे. पण इतर राज्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त जीएसटीची रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे.

पण कोरोनाच्या काळात राज्याचे उत्पन्नच कमी झाल्याने आड्यातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून त्यामुळे येत्या ३१ मार्चनंतर उर्वरित सगळे जीएसटीची पैसे परत येतील. सगळ्याची ओरड शांत होईल, असा होईल, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळे केंद्राला दोष देण्यापेक्षा मदत केल्याबद्दल साधी कृतज्ञताही कोणी व्यक्त करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

यावर मी वस्तूस्थिती सांगतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या राज्यांना जीएसटीची कमी रक्कम मिळाली, आपल्या राज्याला जास्त दिला हे सांगत असताना गेल्या वर्षभरात प्रत्येक राज्यांचे जीएसटीचे उत्पन्न किती आहे. आपल्या राज्याचे उत्पन्न जास्त होते का, हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा आधार घेतच पैसे देऊन कमी पडले तर वाढवून देऊ असे अरूण जेटली यांनी सांगितले होते.

आपला जीसएसटी खूपच कमी होता. कोरोनाच्या काळात जीएसटी कमी जमा झाला. त्यातून सर्वात जास्त रक्कम आपली दिसते. पण २८ फेब्रुवारीपर्यंत  ३२ हजार २९० कोटी रूपये महाराष्ट्राला केंद्राकडून येणे बाकी आहे, असे सांगून दरेकरांचा मुद्दा अजित पवारांनी खोडून काढला. त्यावर श्री. दरेकर म्हणाले, कोरोना काळात उत्पन्न कमी झाले होते. त्यामुळे आडातच नव्हते तर पोहऱ्यात येणार कुठून, म्हणून आपल्याला पैसे मिळालेले नाहीत, असे सांगून येत्या ३१ मार्चपर्यंत उर्वरित पैसेही येतील, असा विश्वास त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com