कऱ्हाड पालिकेचे वीज कनेक्शन तोडले; मुख्य कार्यालयासह पंपिंग स्टेशनचे बिल थकले 

नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनचे सात लाख ९१ हजार, तर मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार ५५० रुपयांची वीजबिले थकीत होती. वारंवार मागणी करूनही ती बिले पालिकेने भरली नाहीत.
Power outage of Karad Municipality; Tired of pumping station bills with head office-ub73
Power outage of Karad Municipality; Tired of pumping station bills with head office-ub73

कऱ्हाड : नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणने आज कनेक्शन तोडले. मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार, तर ड्रेनेज विभागाच्या पंपिंग स्टेशनचे सात लाख ९१ हजारांचे बिल थकीत आहे. त्यामुळे कार्यालयासहीत पंपिंग स्टेशन क्रमांक तीनचे वीज कनेक्शन तोडले आहे. पालिकेच्या अन्य प्रकल्पांचेही थकीत वीजबिलांचे कनेक्शनचेही तोडण्यात येणार आहे, अशी माहिती वीज कंपनीचे सहायक अभियंता बाबासाहेब पवार यांनी दिली. Power outage of Karad Municipality; Tired of pumping station bills with head office

कराड पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार ५५० रुपयांचे वीजबिल पालिका देणे बाकी आहे. शहरातील ड्रेनेज विभागाच्या पंपिंग स्टेशनचीही वीजबिले थकीत आहेत. त्यासह अन्य ठिकाणची थकीत रक्कम सात लाख ९१ हजारांपर्यंत आहे. पालिकेकडे महिनाभरापासून महावितरणने बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र, बिले भरण्यास पालिका टाळाटाळ करत होती.

अखेर थकीत बिलांमुळे आज पालिकेचे कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे तेथील सर्व यंत्रणा काही काळ बंद पडली होती. मात्र, नंतर पालिकेच्या जनरेटरवर कामकाज सुरू होते. ड्रेनेज विभागाच्या पंपिंग स्टेशनचेही वीज कनेक्शनही महावितरणने तोडले. पंपिंग स्टेशन क्रमांक तीनचे वीज कनेक्शन तोडल्याने तेथील यंत्रणा बंद आहे. तेथील पंपिंग स्टेशनचे सात लाख ९१ हजारांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे तेथील वीज कनेक्शन बंद करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला.

त्यासह थकीत वीजबिल असणाऱ्या अन्य पंपिंग स्टेशनचेही वीज कनेक्शन टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहे. शहरातील पालिकेच्या सर्व विभागांचे मिळून जवळपास सात लाख ९१ हजारांचे बिल थकीत आहे. त्यात स्टेडियम स्ट्रीट लाइट, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन, अन्य यंत्रणेचाही त्या थकीत बिलात समावेश आहे. तीही बिले पालिकेने न भरल्यास तोडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनचे सात लाख ९१ हजार, तर मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार ५५० रुपयांची वीजबिले थकीत होती. वारंवार मागणी करूनही ती बिले पालिकेने भरली नाहीत. सातारा येथूनही त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न झाले. मात्र, बिले भरली न गेल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आली, असे महावितरणचे येथील सहायक अभियंता बाबासाहेब पवार यांनी सांगितले. 

नगरपालिकेच्या कार्यालयासह पंपिंग स्टेशनचे वीजबिल थकीत आहे. मात्र, ते फारच जुने थकीत नाही. मागील महिन्यापासूनचे थकीत आहे, तरीही वीज कंपनीने कनेक्शन तोडण्याची कार्यवाही कशी केली, याचे आश्चर्य वाटते. वीजबिल भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तीही पूर्ण होईल. 

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com