पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना फोफावतोय......

जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा देखील केला होता. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार पुसेसावळीत कै. डी. पी कदम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तहसीलदारांनी पाहणी करूनसकारात्मकता दर्शविली होती.मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणाऱ्या बालकबुध्दीच्या पालकमंत्र्यांना ही जागा पसंत पडली नाही.
Politics from Guardian Minister of Corona Outbreak
Politics from Guardian Minister of Corona Outbreak

औंध : कोरोना महामारीने (Corona Pandemic) हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही समाजकारणाचा घेतलेला वसा सोडणार नाही. आम्ही पाठपुरावा केलेल्या कोरोना सेंटरचे धैर्यशील कदमांना श्रेय मिळेल या भितीने पुसेसावळीत कोविड सेंटरचे चोरीछुपे उद्घाटन करून कोरोना महामारीचे राजकारण करणाऱ्या मुजोर पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही असा घणाघाती टोला वर्धन अँग्रोचे (Vardhan Agro) अध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam)  यांनी लगावला. Politics from Guardian Minister of Corona Outbreak

वर्धन अँग्रो कारखान्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कदम म्हणाले की कराड उत्तर मतदारसंघात आरोग्याच्या पुरेशा सोईसुविधा अभावामुळे जनतेची ससेहोलपट होत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी पुसेसावळी, काशीळ, उंब्रज, मसूर आदी ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा देखील केला होता. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार पुसेसावळीत कै. डी. पी कदम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तहसीलदारांनी पाहणी करून सकारात्मकता दर्शविली होती. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणाऱ्या बालकबुध्दीच्या पालकमंत्र्यांना ही जागा पसंत पडली नाही. त्यांनी नागझरी रोडवरील एका शाळेत कोविड सेंटरची जागा निवडली, त्यालाही आमचा आक्षेप नाही. कारण लोकांची सोय होणे आवश्यक आहे.

परंतु काल नाकर्त्या पालकमंत्र्यांनी केवळ चार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन चोरीछुपे पुसेसावळी कोविड सेंटरचे उद्घाटन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. आमचा शिवसेना पक्ष देखील सत्तेत सहभागी आहे. सुनिता कदम या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपल्याला श्रेय मिळावे यासाठी आम्हाला डावलण्याचे काम केले. मात्र इथली जनता सुज्ञ आहे कोणी काय केले हे लोकांना समजते.

मसूर उंब्रजला कोविड सेंटर सुरू झाले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. तहसीलदार प्रांत यांना भेटून निवेदन दिले आहे. मसूरला वर्धन अँग्रो कारखान्याच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेतली असताना पालकमंत्री तेथेही पाय आडवा घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com