मदतीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वंयसेवक संघ राबवतंय राजकीय अजेंडा :  शिवराज मोरे  - Political agenda implemented by Rashtriya Swayamsevak Sangh in the name of help: Shivraj More | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मदतीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वंयसेवक संघ राबवतंय राजकीय अजेंडा :  शिवराज मोरे 

सचिन शिंदे
शनिवार, 15 मे 2021

श्री. मोरे म्हणाले, कोविडच्या काळात नागरीकात भितीचे वातावरण आहे. त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सारेच पक्ष, संघटना विरहीत कामाला लागले आहेत. मात्र त्याही स्थितीत राजकीय अजेंडा राबविण्याच्या हेतूने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या राजकीय गणवेशात उपजिल्हा रूग्णाता विना परवाना मदतीसाठी आले होते.

कऱ्हाड : कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात परवानगी न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते त्यांच्या गणवेशात येवून मदतीच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवत आहेत, असा आरोप युवक काँग्रसचे (Youth Congress) राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे (Shivraj More) यांनी केला आहे. श्री. मोरे यांनी उपजिल्हा रूग्णलायतील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे (Dr. Prakash Shinde) यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे (Ramchandra Shinde) यांच्याकडे तक्रार दाखल केली. (Political agenda implemented by Rashtriya Swayamsevak Sangh in the name of help: Shivraj More)

कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्रावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते काम करत होते. त्यांचा नागरीकांशी वाद झाला होता. त्याची माहिती मिळताच युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे त्वरीत उपजिल्हा रूग्णालयात आले. त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यावर हरकत घेत विना परवाना त्यांनी सुरू केलेल्या मदतीच्या नावाखालील त्यांच्या अजेंड्याचा विरोध केला.  श्री. मोरे यांनी वैद्यकीय अधीक्षक शिंदे यांची भेट घेवून तक्रार दिली.

हेही वाचा : आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्यघटनेच्या तरतुदी भंग करणारा..काँग्रेस छेडणार आंदोलन

त्यानंतर श्री. मोरे यांनी त्याची माहिती दिली. श्री. मोरे म्हणाले, कोविडच्या काळात नागरीकात भितीचे वातावरण आहे. त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सारेच पक्ष, संघटना विरहीत कामाला लागले आहेत. मात्र त्याही स्थितीत राजकीय अजेंडा राबविण्याच्या हेतूने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या राजकीय गणवेशात उपजिल्हा रूग्णाता विना परवाना मदतीसाठी आले होते. उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण सुरू आहे.

तेथे ते काम करत होते. त्यांनी तेथे वादही घातल्याने आम्ही तेथे गेलो. त्यांचा तो राजकीय अजेंडा असल्याचे लक्षात येताच त्याचा निषेध केला आहे. उपजिल्हा रूग्णालयाने त्यांना परवानगी दिलीच कशी हाच खरा प्रश्न आहे. त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. असे असेल तर समाजाली सर्वच संघटना आपला अजेंडा राबवून मदतीचे नाटक करतील. आमच्या तक्रारीची दखल घेवून शासनाने संघाला ताकीद देवून त्यांना थांबवले आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची गणवेशात सेवा करणे म्हणजे त्यांनी भाजपच्या प्रचाराचा अजेंडा राबवण्यासारखेच आहे. समाजसेवा करण्यासाठी संघाच्या गणवेशात येण्याचे कारणच नाही. सामान्य लोकांना दाखवण्यासह आपला राजकीय अजेंडा राबवण्याला आमचा विरोध आहे. 

- शिवराज मोरे  (युवक काँग्रेस, राज्य उपाध्यक्ष)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख