साताऱ्यात वाद पेटविणारा तो फलक कसा पडला, हे पोलिसांनी शोधले... - Police found out how the controversial billboard fell in Satara ... | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात वाद पेटविणारा तो फलक कसा पडला, हे पोलिसांनी शोधले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

आता फलकाच्या अनुषंगाने विनाकारण वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा पोलिसांनी करत त्यानुसार लक्ष केंद्रीत केले आहे. 
 

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाला लावलेला फलक फडल्याचा आरोप करत खासदार उदयनराजे समर्थक सकाळी आक्रमक झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाहून फलक ताब्यात घेऊन या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. या तपासात सदरचा फलक हा नैसर्गिकरित्या फाटून खाली पडल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबतचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. 

खासदार समर्थकांच्या आरोपातील हवा पूर्णपणे निघून गेली आहे. सदर फलकाच्या अनुषंगाने विनाकारण वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्था
धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा पोलिसांचा असून त्याअनुषंगाने पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरची पाहणी आणि त्यानंतर उद्‌घाटन शुक्रवारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी भुयारी मार्गाच्या एका मार्गिकेवर लावण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग हा फलक फाटून खाली पडल्याचे दिसून आले. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले व त्यांनी सदरचा फलक कोणीतरी अज्ञाताने फाडल्याचे सांगत संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

त्यामुळे काही वेळ पोवईनाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने तो फलक ताब्यात घेऊन या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. या तपासात सदरचा फलक हा नैसर्गिकरित्या फाटून खाली पडल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नसल्याचे उघड झाले आहे.

याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे प्रसिध्दी पत्रक देऊन फलकाबाबतचे नेमके कारण पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार समर्थकांच्या आरोपातील हवा निघून गेली. त्यामुळे आता फलकाच्या अनुषंगाने विनाकारण वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा पोलिसांनी करत त्यानुसार लक्ष केंद्रीत केले आहे. 
 

 

 
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख