साताऱ्यात पोलिसांची गुटख्यावर कारवाई; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Police crackdown on gutkha in Satara; Ten lakh items confiscated | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात पोलिसांची गुटख्यावर कारवाई; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांना सातारा शहरातील बुधवार पेठ येथे एक व्यक्ती जीपमधून हिरा गुटख्याची पोती विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित व्यक्तीस सकाळी साडे नऊच्या दरम्यान ताब्यात घेतले.

सातारा : बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी आलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सातारा शहरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिरा पान मसाल्याची २६ पोती व रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती व बोलेरो जीप असा एकुण दहा लाख ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैध गुटखा विक्री प्रकरणी सातारा शहरात आठ जणांवर कारवाई करून २४ हजार ७०६ रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांना सातारा शहरातील बुधवार पेठ येथे एक व्यक्ती जीपमधून हिरा गुटख्याची पोती विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित व्यक्तीस सकाळी साडे नऊच्या दरम्यान ताब्यात घेतले.

त्याच्याकडून हिरा पान मसाल्याची २६ पोती व रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती व जीप असा एकुण दहा लाख ५२ हजार ०६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून २४ हजार ७०६ रूपयांचा गुटखा जप्त केला आहे.

या कारवाईत पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभागी घेतला. या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख