प्रलंबितप्रश्नी माथाडी कामगारांचा सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम  - Pending question Mathadi workers' ultimatum till Monday | Politics Marathi News - Sarkarnama

प्रलंबितप्रश्नी माथाडी कामगारांचा सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 डिसेंबर 2020

माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न राज्य शासनाकडून सोडविले जात नाहीत. कोरोनाच्या संकटात माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे केली,

ढेबेवाडी (ता. पाटण) : "केंद्र शासनाने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल आणि नवीन कायदे शेतकरी व कामगारांना उद्‌ध्वस्त करणारे आहेत. ते तातडीने मागे घेऊन नवीन कायदे करावेत आणि राज्य शासनाने तमाम माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अन्यथा महाराष्ट्रातील माथाडी कामगार सोमवारी (ता. 14) लाक्षणिक संपावर जातील,' असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेत्यांनी दिला आहे. 

नवी मुंबईतील माथाडी भवन येथे माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी माथाडी कामगारांशी संवाद साधला. केंद्र शासनाने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे.

माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न राज्य शासनाकडून सोडविले जात नाहीत. कोरोनाच्या संकटात माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे केली, काही कामगारांचा काम करताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला माथाडी कामगारांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे.

रेल्वेने प्रवास करण्यास कामगारांना रेल्वे पास व तिकीट द्यावे. सल्लागार समितीची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांची नेमणूक करावी, यासह अनेक मागण्या राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित आहेत. निवेदने, संप, मोर्चे आंदोलने करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे या वेळी माथाडी नेत्यांनी सांगून शासनाला निर्णयासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली. भारत बंद यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख