कराड : उपचार सुरू असताना रात्री पावणे अकरा वाजता विलासकाका उंडाळकर यांनी रयत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दवाखान्यात बोलावून घेऊन शेतकऱ्यांचे किती दिवसांचे ऊस बील दिले आणि किती बाकी आहे, याची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना वेळेत बिले द्या, त्यांची अडचण नको, अशी सूचना विलासकाका उंडाळकरांनी केली होती. आजारी असूनही काकांना आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडचणींची काळजी होती.
माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे आज पहाटे उपचार सुरू असताना साताऱ्यात निधन झाले. दरम्यान काल (रविवारी) रात्री पावणे अकरा वाजता त्यांनी रयत कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्याकडून ऊसाचे गाळप किती झालंय, शेतकऱ्यांना किती दिवसांचे बील दिले, किती देणे बाकी आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बिले द्या, त्यांची अडचण नको, आशा सूचना केल्या होत्या.
तत्पूर्वी त्यांनी कोयना बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडून बँकेची आर्थिक स्थितीची माहिती घेऊन त्यांना सर्वसामान्यांच्या पैशाची व्यवस्थित जपणूक करा आशा सुचना त्यांनी केल्या. त्याचबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासूनचे सारथी आणि विश्वासू मदतनीस असलेल्या हणमंत मोरे यांच्या सर्व कुटुंबियांशी फोनवर बोलून त्यांना हणमंतराव यांच्याबद्दल गौरवाचे शब्द काढले. त्यावेळी माझे डोळे पाण्याने भरून आले, असे श्री मोरे यांनी सांगितले.

