पाटणमध्ये गृहराज्यमंत्र्यांची जोरदार मुसंडी; ६८ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच

119 पैकी 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व राहिले. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रियेत 68 ठिकाणी शिवेसना आहे. तालुक्यात 746 तर सुपने, तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण निवडणक लढवलेल्या 852 पैकी 536 शिवसेनेचे व उमेदवार निवडुन आले आहेत.
Shivsena Minister Shambhuraj Desai
Shivsena Minister Shambhuraj Desai

मोरगिरी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढल्या होत्या. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः पुढाकार घेऊन याबाबतची बांधणी केली होती. परिणामी पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींपैकी 68 ठिकाणी शिवसेनेची सत्ता असून तेथे सरपंच ही शिवसेनेच्या विचारांचा झाला आहे. 

पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली झाल्या. यामध्ये शिवसेनेची 107 पैकी 68 ग्रामपंचायतीवर सत्ता आली आहे. तसेच 68 ग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच झाले आहेत. पाटण तालुक्यातील 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. त्यात मतदारसंघातील सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता.

तेथे 119 पैकी 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व राहिले. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रियेत 68 ठिकाणी शिवेसना आहे. तालुक्यात 746 तर सुपने, तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण निवडणक लढवलेल्या 852 पैकी 536 शिवसेनेचे व उमेदवार निवडुन आले आहेत.

पाटण तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच, उपसरपंचांच्या निवडी झाल्या आहेत. काहीर, टेळेवाडी, वजरोशी, कामरगांव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, आरक्षणामुळे रिक्त झालेल्या चव्हाणवाडी नानेगांव, खोनोली व पाळशीसह मुरुड, पाठवडे दिवशी बुद्रुक येथे तीन शिवसेनेचे उपसरपंच आहेत. नुतन सरपंच, उपसरपंच यांचा नुकताच मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com