विधानभवनाच्या दारातच विरोधकांची अभिरूप विधानसभा.... - Opposition's Abhirup assembly at the door of Vidhan Bhavan .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विधानभवनाच्या दारातच विरोधकांची अभिरूप विधानसभा....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

देवेंद्र फडणवीस तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है....अशी घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून काल विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर अध्यक्षांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले. यावरून भाजपचे आमदार संतप्त झाले असून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला असून आता अध्यक्ष निवडीत विरोधकांचे पारडे जड दिसू नये म्हणूनच त्यांनी या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, यासाठी आज विधानभवनाच्या दारात विरोधकांनी अभिरूप विधानसभा भरविली. पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत आमदारांचे निलंबन मागे घ्यावी, अशी मागणी केली. Opposition's Abhirup assembly at the door of Vidhan Bhavan ....

यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी आमदारांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी 
देवेंद्र फडणवीस तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है....अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिरूप विधानसभा भरविण्यात आली. यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारचा विरोधकांवर अन्याय चालला आहे.

हेही वाचा : आजपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसी, मराठा व मागासवर्गीयांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर या सरकारमध्ये आवाज उठविला. त्यावरून अध्यक्षांनी खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले आहे. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत, अशा गोष्टी सांगून धादांत खोट्या गोष्टींच्या आधारे आमदारांना निलंबित केले जात आहे. या विधानसभेत सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव ठेवत आहे.

आवश्य वाचा : १२ आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू

या सरकारच्या विरोधात अनेक सदस्यांना या प्रस्तावावर चर्चा करायची आहे. सरकारचा कारभार कशापद्धतीने चालला आहे. त्यासंदर्भात अनेक सदस्यांना म्हणणे मांडायचे आहे. सरकारच्या विरोधात विविध गोष्टींचा पर्दाफास करायचा आहे. ज्या सदस्यांनी नावे दिल आहेत. त्या सदस्यांना या प्रस्तावावर मत मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.  

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, वारंवार सरकारकडे कामकाज सल्लागार समितीकडे दोन ते तीन आठवड्याचे अधिवेशन घ्या, अशी मागणी केली होती. कोविडच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना घेणे देणे नाही. लोकशाहीच्या मंदीरात विरोधी पक्षांच्या आमदारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचे बेकायदेशीर निलंबन केले आहे. ही नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती केली आहे.

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. घटनेच्यावेळी आम्ही सर्वजण होतो, नसलेल्या गोष्टी अध्यक्षांनी सांगायला सुरवात केली. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला जात नाही. जयकुमार गोरे म्हणाले, विधानसभेत आघाडी सरकारला महाराष्ट्रातील जनतेबद्दल बोलण्यासाठी बंदी घातली असून सगळे कायदे धाब्यावर बसवून लोकप्रतिनिधींचे तोंड बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

पण, आपण सर्व समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी या अभिरूप अधिवेशनातून दिली आहे. विकास कामांची भूमिका या विषयी काहीही नाही. केवळ विरोधी पक्षाला अडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बैठक घ्यावी लागते. सत्ताधारे सदस्य पहिल्या बाकावर बसून एकमेकांना खुणवत होते. ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे छगन भूजबळ यांनी ओबीसी समाजाचा उपयोग सर्व सामान्य ओबीसींसाठी कधी ही केला नाही.

आपली ताकद बनविण्यासाठी, मंत्री पद टिकविण्यासाठी भूजबळांनी समाजाचा वापर केला आहे. भूजबळांची ढाल करून ओबीसी समाजावर सत्ताधाऱ्यांनी अन्याय करण्याचे काम केले आहे. आघाडी सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाची भूमिका फडणवीस साहेब मांडत होते. आरक्षण कसे देता येईल ही भूमिका मांडत होते. सरकारमुळे आरक्षण गेले अशी भूमिका सभागृहात व जनतेसमोर येऊ नये म्हणून पुन्हा एकदा आघाडी सरकारने ओबीसींचा चेहरा असलेल्या भूजबळांना उभे केले.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याची भूमिका घेण्याऐवजी ते सरकारला वाचविण्याचे काम ते करत होते. ज्या पध्दतीने भास्करराव जाधवांनी ज्या पध्दतीने भूमिका मांडली. ज्या गोष्टी घडल्याच नव्हत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचा आम्ही निषेध करतो, त्यांनी अध्यक्ष पदाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. खूर्चीचे महत्व गरिमेला काळे फासण्याचे काम भास्करराव जाधव यांनी खोटे बोलून केले. याचा निषेध करतो. सभागृहात घटलेली घटना कथन करत होते. त्यावेळी त्यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्याचे सांगत होते. मुळात शिव्या भास्करराव जाधवांनीच दिल्या, असा  गौप्‍्‍यस्फोट त्यांनी केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख