मंदिरे खुली करण्यासाठी भाजप करणार राज्यव्यापी शंखनाद आंदोलन

आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा आणि शंख वाजवून आंदोलन करावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली.
मंदिरे खुली करण्यासाठी भाजप करणार राज्यव्यापी शंखनाद आंदोलन
for open temples BJP do shankhanad andolan ; Appeal to activists to participate

मुंबई : कोरोना साथीचे कारण देत गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीने येत्या ३० ऑगस्टला होणाऱ्या राज्यव्यापी शंखनाद आंदोलनात पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.for open temples BJP do shankhanad  andolan ; Appeal to activists to participate

ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजिविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

शंखनाद आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा आणि शंख वाजवून आंदोलन करावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in