ऑलंपियन प्रविणचे आई-वडीलही चॅम्पियन; नरेंद्र मोदींकडून कौतुक

या स्पर्धेनंतर आपण वेळ काढून आपल्या निवासस्थानी सर्वांना निश्चितपणे भेटणार असल्याचे मोदींनी आवर्जून सांगितले.
ऑलंपियन प्रविणचे आई-वडीलही चॅम्पियन; नरेंद्र मोदींकडून कौतुक
Olympian Praveen's parents are also champions; Appreciation from Narendra Modi

फलटण शहर : मेहनत, प्रामाणिकपणा व चिकाटीची ताकद काय असते हे देशाला प्रवीण जाधवच्या रुपातून दिसले आहे. टोकीयो ऑलंपिकमध्ये ध्येय व लक्ष यावरुन नजर हटू देवू नका. जिंकण्याच्या दबावात न खेळता निर्भिडपणे आपला सर्वोत्तम खेळ दाखविण्याच्या इर्षेने खेळा, १३५ कोटी भारतीयांच्या शुभेच्छा व आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. Olympian Praveen's parents are also champions; Appreciation from Narendra Modi

जपान येथे होणाऱ्या टोकीयो ऑलंपिक स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सरडे (ता. फलटण) येथील प्रविण जाधव (धनुर्विद्या) व अन्य विविध क्रिडा प्रकारांतील खेळाडू व त्यांच्या परिवाराशी पंतप्रधानांनी आज ऑनलाईन संवाद साधत प्रेरणा दिली. यावेळी पंतप्रधानांनी प्रविणसह अन्य खेळाडू व त्यांच्या परिवारातील सदस्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली व काही माहितीही जाणून घेतली. कोरोना काळातील संकट, सरावात आलेले अडथळे याशिवाय दुखापतीतून सावरुन देशासाठी खेळण्याच्या जज्बा या सर्व गोष्टींवर मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.

हेही वाचा : बनावट गुणपत्रिकेवर पत्नीला सरपंच केलेले भाजप आमदार तुरूंगात
 
प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करताना प्रविणसारख्या गरीब खेळाडूमागे परिस्थितीचा विचार न करता पाठबळ उभे करणारे त्याचे आई व वडीलही खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहेत, असे गौरवोदगार पंतप्रधान मोदींनी यावेळी प्रविणचे वडील रमेश व आई संगिता यांच्याविषयी काढले. ऑलंपिक स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू हा आपल्या खेळाचा नावलौकिक वाढवेल व या स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण करेल, असा देशाला विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. 

प्रविणसारखे अन्य मुलांनीही खेळावे... 

तुमचा मुलगा ऑलंपिकमध्ये खेळणार आहे. त्या अनुषंगाने आपणास काय वाटते, असा प्रश्न पंतप्रधानांनी रमेश जाधव यांना विचारला. ‘प्रविणचे नाव देशभरात झाले आहे. गावाचेही नाव सर्वत्र झाले, याचा आपणास आनंद होतो. ग्रामिण भागातील अन्य मुले प्रविणसारखे खेळाडू म्हणून पुढे यावेत व त्यांनीही पदक जिंकावेत. असे झाले तर त्यासारखे दुसरे समाधान व आनंद कुठलाही नाही, असे जाधव यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. 

अॉलंपिक स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. कोरोनामुळे सर्व काही बदलले आहे. इच्छा असूनही प्रत्यक्षपणे भेटता आले नाही. परंतू, या स्पर्धेनंतर आपण वेळ काढून आपल्या निवासस्थानी सर्वांना निश्चितपणे भेटणार असल्याचे मोदींनी आवर्जून सांगितले. प्रविण जाधवशिवाय मेरी कोम, सानिया मिर्झा, दीपिका कुमारी, नीरज चोप्रा, दीपिका कुमारी, पीव्ही सिंधू या खेळाडूंनीही या चर्चेत भाग घेतला. 

मोदींची उत्सुकता अन प्रविणचे उत्तर... 

ॲथलेटीक खेळाडू म्हणून सुरुवातीस प्रविण निवडला गेला होता. परंतू, नंतर तो धनुर्विद्याकडे (आर्चरी) वळला. हा बदल कसा काय याबाबतची उत्सुकता मोदींनी व्यक्त केली. माझी ॲथलेटीकसाठी निवड झाली होती. पण, मी शरीराने कमजोर होतो. त्यामुळे माझा कल आर्चरीकडे वळाला. अमरावतीत आत्मविश्वास, खडतर कष्ट, उत्कृष्ट ट्रेनिंग व सरावामुळे मला आर्चरीमध्ये यश मिळाले. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने घरी राहिलो असतो तर मलाही मजुरी करावी लागली असती. त्यापेक्षा इथचं राहून खडतर परिश्रम करण्याचा आपण निर्णय घेतल्याचे प्रविणने पंतप्रधानांना सांगितले. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in