जरंडेश्वर कर्जप्रकरणी सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्जप्रकरणात सक्षम पुरावे, जामीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे. ही सर्व माहिती ईडीने मागवली आहे.
Notice of ED to Satara District Bank in Jarandeshwar loan case
Notice of ED to Satara District Bank in Jarandeshwar loan case

सातारा : जरंडेश्वर कारखान्यावर सत्कवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केल्यानंतर आता या कारखान्याला कर्ज दिलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. यामध्ये कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का, याचा माहिती ईडीने मागितली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँकेलाच जरंडेश्वर प्रकरणी नोटीस आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. Notice of ED to Satara District Bank in Jarandeshwar loan case

दरम्यान, कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटीशीला सक्षमपणे उत्तर देऊ, असेही जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे. नुकतीच कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सत्कवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या कारवाईकडे गेले.

यानंतर ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करून कारवाई मागे घेण्याची मागणी केली. तसेच कारखाना सुरू ठेवण्याची मागणीही केली. हे सर्व सुरू असतानाच जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ईडीने नोटीस बजावली आहे. ही नोटीस दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत धडकली असून यानंतर संचालक मंडळासह अधिकाऱ्यांची पळापळी सुरू झाली.

मात्र, नोटीसीत ईडीने जरंडेश्वरला कर्ज पुरवठा केल्याबद्दलची माहिती जिल्हा बँकेकडून मागवली आहे. यात कशासाठी व किती कर्ज पुरवठा केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का, आदी माहिती बँकेकडून या नोटीसीव्दारे ईडीने मागविली आहे. ज्यावेळी हा कर्जपुरवठा केला त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष होते.

यासंदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बँकेने जिल्ह्यातील विविध कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे. त्यानुसार जरंडेश्वर कारखान्याला बँकेने २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. सध्या ९६.५० कोटी रूपये येणे बाकी आहे.

जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्जप्रकरणात सक्षम पुरावे, जामीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे. ही सर्व माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडीच्या नोटीसीचा कोणताही परिणाम जिल्हा बँकेवर होणार नाही. जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्यानंतर शुक्रवारी (ता. ९) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बँकेत थांबून जरंडेश्वरच्या कर्जप्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com