शेतकऱ्यांना दिलासा पण; मोदी सरकारला दिलेली पळवाट नाही ना : पृथ्वीराज चव्हाण - This is not a loophole given to Modi government: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना दिलासा पण; मोदी सरकारला दिलेली पळवाट नाही ना : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करुन मोदी सरकारला दणका दिला आहे. हा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जरी तात्पुरता दिलासा असला तरी हा कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो.

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करून मोदी सरकारला दणका दिला आहे. मात्र, हा शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा असला तरी कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो. न्यायालयाने कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते, त्यामुळे ही मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करत केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. शेतकरी संघटनांनी न्यायालयाच्या आदेशांचे स्वागत केले असले आंदोलनमात्र, कायम ठेवण्याचा निर्धार या संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्टीटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायदे स्थगित करुन मोदी सरकारला दणका दिला आहे. हा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जरी तात्पुरता दिलासा असला तरी हा कार्यपालिकेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करणे अपेक्षित होते. ही मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना, असा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख