चायवाला मोदी नव्हे, हा तर देश विकणारा मोदी....

पटोले म्हणाले, आतापर्यंत देशातील लोकांच्या त्यांनी अनेक परिक्षा पाहिल्या आता लोकांचा उद्रेक त्यांना पहायला मिळेल, असा इशारा त्यांनी मोदींना दिला.
चायवाला मोदी नव्हे, हा तर देश विकणारा मोदी....
This is not chaiwala Modi, he is Modi selling the country says Congress Leader Nana Patole

सातारा : हेरगिरीच्या माध्यमातून संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्य संपविण्याचे काम केंद्र सरकार व मोदी करत आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण करावे, अशी विरोधकांची भूमिका आहे. पण केंद्रात बसलेले हे निगरघट्ट सरकार जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार नाही, हे लोकशाहीला घातक आहे, अशी टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली. दरम्यान, आम्ही मोदींना चायवाला नव्हे, देश विकणारा मोदी.. असेच म्हणणार आहोत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. This is not chaiwala Modi, he is Modi selling the country says Congress Leader Nana Patole

केंद्र सरकारच्या अडमुठेपणा करत असून सगळे विरोधी पक्ष एकवटलेले असताना एखाद्या विषयावर बोलणेच हे सरकार टाळतंय, याविषयी विचारले असता नाना पटोले म्हणाले, चोराच्या दाढीत लिंका...अशी म्हण आपल्याकडे आहे. यामध्ये दाढी कोणाची आणि चोर कोणाला म्हणतोय असेही काहीही नाही. ही म्हण आपल्याकडेही आहे आणि हिंदीत ही आहे.

तीनशे लोकांचे फोन टॅपिंग झाले. यामध्ये इस्त्राईलची संस्था कार्यरत होती, ती सरकारच्या माध्यमातून त्यापध्दतीची यंत्र वापरते, हे त्यांनी जाहीर केलेले आहे. याबाबत केंद्र सरकार पुढे येऊन बोलत नाही. देशाच्या पुढे अनेक प्रश्न, समस्या आहेत. महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. या ही प्रश्नांवर लोकसभेत चर्चा झाली पाहिजे. ही कृत्रिम महागाई आहे, असा आक्षेप सातत्याने काँग्रेसने घेतला आहे. या मुद्दंयाबरोबरच हेरगिरी आणि प्रायव्हेसीचा प्रश्न ही आला आहे.

संविधानाने आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. ते संपविण्याचे काम केंद्र सरकार व मोदींच्या माध्यमातून सुरू आहे. याबाबत त्यांनी एकदा स्पष्टीकरण केले पाहिजे, ही विरोधकांची भूमिका असून ती रास्त आहे. आज केंद्रामध्ये बसलेले निगरघट्ट सरकार जनतेच्या प्रश्नावर चर्चा करायला तयारच नाही, हे लोकशाहीला घातक आहे, अशी टीकाही श्री. पटोले यांनी केली. प्रल्हाद मोदी हे मोदींचे भाऊ आहेत. या दोन मोदींमध्ये काय ठरलंय ते देशांतील लोकांना मोदींनी सांगावे. कशासाठी प्रल्हाद मोदी हे बोलत आहेत, याचा खुलासा येईल.  

राहूल गांधी यांनी जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स असे यापूर्वीच जाहीर केले आहे. नोटबंदी बद्दल ही त्यांनी प्रतिक्रिया देऊन त्याचे परिणाम ही विषद केले होते. १३० कोटी लोकसंख्येच्या देशाचा जीडीपी दहा टक्केने कमी झाला आहे. अशा या देशात पुढल काळात काय परिस्थिती होणार हा प्रश्न आहे. ही महागाई व पैसा चाललाय कुठे, ज्या उद्योगपतींचे कर्जमाफ केलंय अशा लोकांच्या घरी हा पैसा चाललाय काय, हे मोदींनी जाहीर करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पटोले म्हणाले, आतापर्यंत देशातील लोकांच्या त्यांनी अनेक परिक्षा पाहिल्या आता लोकांचा उद्रेक त्यांना पहायला मिळेल, असा इशारा त्यांनी मोदींना दिला. चायवाला म्हणण्यापेक्षा चायवाल्याचा बेटा म्हणा, ज्याचा मुकुट मोठा त्यालाच पत्रकार चावतात, असे मोदी म्हणतात, आम्ही मोदींना चायवाला नव्हे देश विकणारा मोदी, असेच म्हणणार आहोत, अशी खिल्लीही पटोलेंनी उडवली. 

गणपतराव एक चालती बोलती विधानसभाच...

गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहताना नाना पटोले म्हणाले, आबांसोबत मी तीन टर्म काम केलेले आहे. नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणारे ते नेतृत्व होते. त्यांच्या सांगोला विधानसभा क्षेत्रावर असलेले त्यांचे प्रेम, विकासाचे स्वप्न तसेच राज्यातील विविध शेतकरी व कामगारांच्या प्रश्नाबाबत सातत्याने लढाऊ वृत्ती त्यांच्या रूपाने आम्हाला पहायला मिळाली. त्यांच्याकडून खूप गोष्टी आम्ही शिकल्या. एक चालती बोलती विधानसभाच आबांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यांच्या जाण्याने संसदीय व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने मी त्यांना विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in