राज्य सरकारचा निर्णय काहींच्या जिव्हारी लागला : अजित पवार

माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात पवारसाहेबांची 50-55 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी 30 वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत आहे, मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
No one should interfere in development work, be it the Central and State Governments. :
No one should interfere in development work, be it the Central and State Governments. :

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलेला दिसतो. म्हणूनच असा टोकाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला. 

केंद्र आणि राज्यसरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. मी कधीही विकासकामात राजकारण आणले नाही, मी उलट मदतच करत असतो, असाही टोला त्यांनी लगावला. 

दोन वर्षांपूर्वी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी कांजूरमार्गची मिठागर पट्यातील ही जमीन एमएमआरडिएला दिली होती. यावरील 102 एकर जमिनीवर मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केन्द्र सरकारकडून आज उच्च न्यायालयात या भूमिकेला विरोध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायद्याच्या कक्षेत नसल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी अतिरिक्त सौलिसीटर जनरल अनील सिंह यांनी केली.

राज्य सरकारच्या मेट्रो कारशेडच्या बांधण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका केन्द्राकडून मिठ आयुक्तांनी केली आहे. मिठागरे आमच्या मालकाची आहेत असा दावा केन्द्राकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात पवार यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील.

काम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल असेही अजित पवार म्हणाले.  माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात पवारसाहेबांची 50-55 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी 30 वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत आहे, मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com