रा. स्व. संघाच्या मंडळींनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; मंत्र्याचा आदेश

लसीकरणात पारदर्शकता आणण्याची सक्तसूचनाही पालकमंत्र्यांनी दिली. लसीकरण केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करा. तेथील लसीकरण सुरळीत पध्दतीने होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार वाकडे व वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
रा. स्व. संघाच्या मंडळींनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; मंत्र्याचा आदेश
No need to come in special uniforms and work: a minister's suggestion

कऱ्हाड : सामाजिक काम (Social Work) करताना विशिष्ठ गणवेशात काम करणे योग्य नाही. उपजिल्हा रूग्णालयात जो प्रकार झाला तो पुन्हा होऊ नये, अशी ताकीद पालकमंत्री (Guardian Minister) तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी आज उपजिल्हा रूग्णालयात दिली. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) नाव न घेता त्यांनी गणवेशात (Uniform) येवून रूग्णांची सेवा करण्याचा प्रकार योग्य नसल्याची टिप्पणी केली. पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याची सक्त सुचनाही उपजिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांना त्यांनी केली आहे. (No need to come in special uniforms and work: a minister's suggestion)

कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी लसीकरणाची माहिती घेतली. तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सुचना केल्या. युवक काँग्रेस व संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या प्रकाराचा उल्लेख करताना पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नामोल्लेख टाळला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक संघटनांना सेवा करण्यास हरकत नाही. मात्र, विशिष्ठ गणवेशात येऊन काम करण्याची गरज नाही. परवा जो प्रकार झाला. तो चुकीचा आहे. पोलिस, डॉक्टरांनी गणवेश घातला पाहिजे. मात्र सामाजिक काम करणाऱ्यांनी गणवेश घालण्याची गरज नाही. तसे पुन्हा होऊ नये, याची काळजी घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना कडक शब्दात सुचना दिल्याने यंत्रणाही हडबडली आहे.

लसीकरणात पारदर्शकता आणण्याची सक्तसूचनाही पालकमंत्र्यांनी दिली. लसीकरण केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करा. तेथील लसीकरण सुरळीत पध्दतीने होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार वाकडे व वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री गेल्यानंतर तहसीलदार वाकडे यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन लसीकरणासाठी नागरिकांची यादी व टोकण पध्दतीची पाहणी केली.

प्रशासनाच्या सुचनेनुसार पहिली व दुसरी लस देण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी गर्दी न करता शांततेत येऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणात पारदर्शकता आणत आहोत. तसे न झाल्यास निदर्शनास आणू द्यावे, त्यात सुधारणा होईल. नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार वाकडे केले. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in