वाई पालिकेत अखेर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष; उपनराध्यक्षांनी स्वीकारला पदभार... - NCP's mayor in Wai municipality; Vice President takes over ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

वाई पालिकेत अखेर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष; उपनराध्यक्षांनी स्वीकारला पदभार...

भद्रेश भाटे
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

मुख्याधिकारी गैरहजर असल्याने कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

वाई : वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना राज्यसरकारने पदच्युत केल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाचा कार्यभार नियमानुसार आज पालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वीकारला. त्यामुळे पालिकेच्या कारभाराची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहेत. NCP's mayor in Y municipality; Vice President takes over ...

डॉ. प्रतिभा शिंदे या सन २०१६ मध्ये भाजपातर्फे अवघ्या एक मताने थेट जनतेतून नगराध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या. तेव्हापासून त्या या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान शहरातील शौचालयाच्या बांधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पतीमार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्षा डॉ. शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध एक जून २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर पालिकेतील १६ नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती.

हेही वाचा : रोहित पवारांच्या गाडीत बसून देशमुखांनी आखली आमदारकीची व्यूव्हरचना...!

त्याची सुनावणी २० ऑगस्ट २०२० आणि ३ सप्टेंबर २०२० रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती. त्यावेळी त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि त्यांचे लेखी निवेदन विचारात घेतल्यानंतर बुधवारी (ता.४) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १६६५ चे कलम ५५ (अ व ब) मधील तरतुदीनुसार नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्ष पदावरून दूर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला.

आवश्य वाचा : नीलम गोऱ्हेंनी घेतली `मीडिया ट्रायल` वाल्यांची झाडाझडती!

तसेच यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्य होण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढला. शासनाच्या या निर्णयाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज नगराध्यक्ष तसेच पालिका प्रशासनास देऊन नगरपरिषद, नगरपंचायती,व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५७(२) नुसार रिक्त झालेल्या या पदाच्या कार्यभार हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश दिला.

त्यानुसार मुख्याधिकारी गैरहजर असल्याने कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी गटनेते भारत खामकर नगरसेवक प्रदिप चोरगे,चरण गायकवाड, किशोर बागुल, राजेश गुरव, संग्राम पवार, ॲड. श्रीकांत चव्हाण, दीपक ओसवाल, कांताराम जाधव, नगरसेविका सीमा नायकवडी, शितल शिंदे, स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, आरती कांबळे यांची उपस्थिती होती. श्री. सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी  फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

 

आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य आणि प्रशासनास विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करू. शहरातील सर्व प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहून आणि मिळालेल्या संधीचे सोनं करून वाईचा सर्वांगीण विकास करून दाखवू 

-अनिल सावंत (नगराध्यक्ष, वाई).

मला शासनाच्या आदेशाची प्रत मिळाली आहे. शासनाकडे सुनावणी झाली होती,परंतु एवढ्या झटपट निर्णय होईल असे वाटले नव्हते. हे सर्व अनपेक्षित आहे. याबद्दल मला कोणालाही दोष द्यायचा नाही व कोणावरही टीकाटिप्पणी करायची नाही. मात्र शासनाच्या या निर्णयाबाबत माझ्या वकिलांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे.
-डॉ प्रतिभा शिंदे (माजी नगराध्यक्षा, वाई)

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख