राष्ट्रवादी करणार पूरग्रस्त 16 हजार कुटुंबांना मदत...

पवारसाहेबांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील आम्हा निवडक सहकाऱ्यांची बैठक घेऊन पूरबाधितांच्या स्थितीबद्दल तसेच बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला.
राष्ट्रवादी करणार पूरग्रस्त 16 हजार कुटुंबांना मदत...
NCP Walfare Trust Helps 16 thousand Flood affected Family

मुंबई : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरबाधित झालेल्या १६ हजार कुटुंबांच्या मदतीसाठी जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंचा संच वितरित करण्याबाबत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. NCP Walfare Trust Helps 16 thousand Flood affected Family

पवारसाहेबांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील आम्हा निवडक सहकाऱ्यांची बैठक घेऊन पूरबाधितांच्या स्थितीबद्दल तसेच बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. पूरबाधितांना कोणत्या प्रकारच्या मदतीची प्राधान्याने आवश्यकता आहे याचे तपशील समजून घेतले व त्याप्रमाणे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदतकार्याची आखणी केली. 

पूरबाधितांचे घरसंसार, शेतजमीनही पाण्याखाली गेल्याने झालेलं नुकसान खूप मोठं आहे. पण सध्या तातडीने त्यांना रोजच्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा होणं गरजेचं होतं. म्हणूनच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने सुमारे १६ हजार कुटुंबाची जबाबदारी घेतली. तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाच रुग्णवाहिकांचीही सिद्धता केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in