फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठीच राष्ट्रवादीने खडसेंचा गेम करून पक्षात घेतले : प्रवीण दरेकर   

खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे. गेलेल्या ठिकाणी राहून त्यांनी समाजोपयोगी कार्य करावे. आम्ही त्यांना नांदा सौख्यभरे असेच म्हणतो, असेही दरेकर म्हणाले.
NCP played Khadse's game to target Fadnavis  says BJP Leader Praveen Darekar
NCP played Khadse's game to target Fadnavis says BJP Leader Praveen Darekar

सातारा :​​​​​ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचा कारभार उत्तमप्रकारे सांभाळला. या कार्यकूशल नेतृत्वाचा काहींना पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच एकनाथ खडसेंचा गेम करून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

श्री. दरेकर आज (गुरुवार) सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या दौ-यावर आले आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.  देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची छबी बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे यांचा वापर केलेला आहे असे ते म्हणाले.

खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे. गेलेल्या ठिकाणी राहून त्यांनी समाजोपयोगी कार्य करावे. आम्ही त्यांना नांदा सौख्यभरे असेच म्हणतो, असेही दरेकर म्हणाले. अर्णब गोस्वामी प्रकरणात वकील नेमण्यासाठी राज्य शासनाने वकिलाला पंधरा लाख रुपये दिले. इतकी तत्परता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी का दाखवली नाही, असा प्रश्न श्री. दरेकर यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा वेळी राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक मदत करणे जरुरीचे आहे. मात्र राज्य शासनाने सुशांत सिंह प्रकरणात वकील नेमण्यासाठी १५ लाखांची तरतूद केली शेतकऱ्यांना करताना दाखवली जात नाही. उलट केंद्राकडे बोट दाखवले जाते, हे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात एखाद्या घटनेमध्ये सीबीआय चौकशी लागण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे, याविषयी विचारले असता श्री. दरेकर म्हणाले, देशाचा व सर्व घटक राज्याचा कारभार राज्य घटनेनुसार चालतो. कुठल्याही प्रकरणात राज्य आणि केंद्र संघर्ष उभा करणं हे लोकशाहीला मारक ठरेल तसेच आपल्या व्यवस्थेला देखील हे परवडणारे नाही. त्यामुळे अशांतता पसरेल कायद्याने जो मार्ग दाखवला आहे. तो सगळ्यांना अंगीकारणे आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com