कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व : शशिकांत शिंदे

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या स्थानिक गटाच्या पॅनेलच्या माध्यमातून लढती झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून एकुण ४८ गावांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटांची सत्ता आली आहे. तर सहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित पॅनेलची सत्ता आली आहे.
NCP dominates Gram Panchayats in Koregaon constituency says NCP leader Shashikant Shinde
NCP dominates Gram Panchayats in Koregaon constituency says NCP leader Shashikant Shinde

सातारा : कोरेगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटाच्या पॅनेलने तब्बल ४८ ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली आहे. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सहा ग्रामपंचायतीत सत्ता आल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद व आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.  

कोरेगाव मतदारसंघातील ७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यामध्ये सातारा तालुक्यातील २४, कोरेगाव तालुक्यातील ३४ आणि खटाव तालुक्यातील १९ गावांचा समावेश होता. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक झाली.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या स्थानिक गटाच्या पॅनेलच्या माध्यमातून लढती झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून एकुण ४८ गावांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटांची सत्ता आली आहे. तर सहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित पॅनेलची सत्ता आली आहे.

राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोरेगाव तालुका ः दुघी, त्रिपुटी, भवतवडी, भोसे, भंडारमाची, मध्वापूरवाडी, किन्हई, शेंदूरजणे, तांबी, दुधनवाडी, निगडी, भाकरवाडी, जांबबुद्रुक, बिचुकले, अरबवाडीचा
समावेश आहे. तर बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत कोलवडी, नागेवाडी, बोधेवाडी चि., भिवडी येथे राष्ट्रवादीची तर चिलेवाडी, होलेवाडी या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

सातारा तालुका ः निगडी तर्फे सातारा, कारंडवाडी, फडतरवाडी, सोनगाव सं.
निंब, समर्थगर, वर्णे, अंगापूर वंदन, वासोळे, बसाप्पाचीवाडी, महागाव, गोवे, धनगरवाडी-निगडी, शिवथर, वनगळ(महाविकास) तसेच बिनविरोध मध्ये धनगरवाडी को., अंगापूर तर्फे तारगाव, जाधववाडी, चिंचणी पू. याचा समावेश आहे. 

खटाव तालुक्यातील धारपुडी, रणशिंगवाडी, रेवलकरवाडी, विसापूर, गादेवाडी, चिंचणी, दरूज, खातगुणण, मोळ, वेटणे, मांजरवाडी, महाविकास आघाडीची सत्ता राजापूर, पुसेगांव येथे आली आहे. तसेच बिनविरोध झालेल्या गारवडीत महाविकास आघाडी व कातळगेवाडीत राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com