साताऱ्यात टोलमाफीसाठी राष्ट्रवादीही आक्रमक; सर्वपक्षिय आंदोलात सहभागी होणार 

सेवारस्ते व महामार्गाची दुरावस्था स्थानिकांसाठी टोलसवलत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका झाल्या.परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासकहे प्रश्न सोडवू शकत नाही. तसेच टोलनाक्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे.
NCP also aggressive for toll exemption in Satara; All parties will participate in the movement
NCP also aggressive for toll exemption in Satara; All parties will participate in the movement

सातारा : पुण्याप्रमाणे सातारा जिल्हयात आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर एम.एच.11 व एम.एच. 50 या वाहनांना टोलमाफी द्यावी. या नागरीकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. या संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्याप्रमाणे खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत आंदोलनाची भूमिका घेऊन एम.एच. 12 व एमएच 14 या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे सातारा जिल्हयातील आनेवाडी व 
तासवडे टोल नाक्यांबाबत माफीचा निर्णय घेऊन एमएच-11 व एमएच 50 या वाहनांना टोलमाफी मिळावी. 

त्याबाबत आंदोलनाची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. पुणे सातारा या महामार्गाचे काम सुरु होऊन बराच काळ लोटला असून सदरचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेत पूर्ण केलेले नाही. केंद्र सरकारने संबंधित ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देऊनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरीकांनी टोल का द्यावा, असा प्रश्न श्री. शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच सेवारस्ते व महामार्गाची दुरावस्था स्थानिकांसाठी  टोलसवलत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका झाल्या. परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासकहे प्रश्न सोडवू शकत नाही. तसेच टोलनाक्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. टोलनाक्यावर बोगस पावत्यांचा भ्रष्टाचार नुकताच उघड झाला आहे. याबाबतीत प्रशासनाने खऱ्या सुत्रधारावर कारवाई करणे गरजेचे आहे.

 खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी म्हणून सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा प्रवित्रा घेवून स्वतःच्या पातळीवर हा प्रश्न सोडविला. त्यामुळे एम. एच. 12 व एम. एच 14 या वाहनांना टोलमाफी मिळाली. खासदार सुळे यांच्याप्रमाणे साताऱ्यातील दोन्ही खासदारांनी आनेवाडी व तासवडे या दोन्ही टोलनाक्यावर एमएच-11 व एमएच-50 पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफीसाठी कठोर भूमिका घ्यावी. या टोलमाफी आंदोलनबाबत आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर सर्वांशी चर्चा करुन सर्वाना सोबत घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार्य राहिल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com