नाना पटोलेजी, प्रियांकांचा सल्ला घ्या पण, राज्यातील जनतेला वाचवा..... 

सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंह यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियांका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणा.
Nanaji Take the advice of Priyanka but save the people of the state says Keshav Upadhye
Nanaji Take the advice of Priyanka but save the people of the state says Keshav Upadhye

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्रावर विनाकारण टीका करण्यापेक्षा प्रियंका गांधींना महाराष्ट्रात काही दिवस बोलावून त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्या, मनमोहन सिंह यांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करा, पण राज्यातील जनतेचे जीव वाचवा, असा सल्ला राज्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले यांना दिला आहे.  

राज्य सरकारमधील नबाब मलिक, जितेंद्र आव्हाड आदी मंत्री सातत्याने केंद्र सरकारवर टीका करीत आहेत. त्यासोबत पाटोले यांनीही केंद्रावर आगपाखड केल्याने उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती अतिशय भयानक होत आहे. महाविकास आघाडी सरकार पुरते अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात काल प्रियांका गांधी यांनी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. 

कोरोनासंदर्भात काय केले पाहिजे, याबाबतचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन दिला, सर्वाधिक रेमडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला दिला. हा कोटा किती रुग्ण कोणत्या राज्यात ऑक्सिजनवर आहेत, हे पाहून दिलेला आहे. सुरुवातीपासून सर्वाधिक मदत मिळत असताना केवळ केंद्रावर आरोप करण्याचे काम वगळता महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही. 

सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंह यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियांका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणा. आपण प्रियांका गांधी यांच्या ज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा, असा सल्ला सुद्धा केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com