नाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान

किरकोळ कामांसाठी गोरगरीब जनतेला कायदा शिकवणारे तहसिलदार आणि प्रांताधिकारी पैसे खाऊन डोंगर उत्खननात डोळेझाक करत आहेत. त्यामूळे भूस्खलनाची टांगती तलवार भागातील लोकांच्या मानगुटीवर पडत आहे.
नाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान
Nana Patole reached Wai; District administration's deaf ears about delay

सातारा : पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या माहितीवरून वाई तालुक्यात भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी आज दाखल झाले. त्यांनी या परिसरातील काही गावांची पहाणी केली. यावेळी त्यांनी वाई तालुक्यात झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी प्रशासनाच्या आधी युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोहोचल्याचे सांगून प्रशासनाने अशा प्रसंगी सज्ज राहायला हवे होते. यापुढे कोणाचाही जीव जाता कामा नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. तर नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तातडीने शासकिय मदत पोहोचवावी, असे सांगून शासनाकडून जास्तीत जास्त व  लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री. पटोले यांनी दिले. Nana Patole reached Wai; District administration's deaf ears about delay

अतिवृष्टीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात झालेल्या नुकसानीची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली. त्यानंतर श्री. पटोले यांनी आपला पुणे जिल्ह्यातील नियोजित दौरा अर्धवट सोडून थेट वाई गाठले. वाई मधून बाहेर पडताना नावेचीवाडी येथील तसेच भोगाव, आनी, वरखडवाडी येथील ओढ्याचे पाणी रस्त्यांवरुन धोकादायक स्थितीत वाहत असताना ही नाना पटोले पश्चिमेकडील भागात वेलंग येथे पोहोचले. यावेळी जांभळी बाजुने आलेल्या तहसिलदार यांनी जांभळी ओढ्याचे पाणी पुलावरुन वहात आहे, आपण कृपया जावू नये अशी विनंती केली.  त्यामुळे नाना पटोले देवरुखवाडी येथे पोहचू शकले नाहीत.

अतिवृष्टी मुळे जांभळी, कोंढावळे येथील देवरुखवाडी येथील भयंकर परिस्थितीची माहिती बापू शिंदे यांनी श्री. पटोले यांना दिली. बाधित लोकांना जास्तीत जास्त मदत करावी. तसेच संपूर्ण देवरुखवाडीचे पुनर्वसन करावी अशी मागणी केली. दरवर्षी रस्त्यांवरिल पुल वाहुन जातात. त्यामूळे संपर्क तुटतो. संपूर्ण पश्चिम भागातील पूल हे आरसीसीमध्ये करावेत, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली. त्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना काही सूचना केल्या. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना संपर्क करून वाई तालुक्याच्या पश्चिम भागाचा लवकरच दौरा करुन बाधित लोकांचे पुनर्वसन करावे. तसेच योग्य तो मोबदला मिळावा यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशा सूचना दिल्या.

त्यामूळे लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा वाई तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात दौरा होईल. नाना पटोले यांच्यासोबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, वाई तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र आप्पा भिलारे, वाई यूवक अध्यक्ष प्रमोद अनपट, बापू शिंदे, राजेंद्र शेलार, प्रताप देशमुख, कल्याणराव पिसाळ, महेश भणगे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. पश्चिमेकडील भागातील जनता सोशिक असल्यामुळे या लोकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. बोगस कामे करुन काँन्ट्रक्टर लोकांना फायदा मिळवून दिला जातो. त्यामूळे या भागातील कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची होत आहेत. एक दिवसाआड वीजपुरवठा खंडीत होत असतो.

किरकोळ समस्या असली तरी तीन चार दिवस संपूर्ण जांभळी खोरे अंधारात ठेवले जाते. किरकोळ कामांसाठी गोरगरीब जनतेला कायदा शिकवणारे तहसिलदार आणि प्रांताधिकारी पैसे खाऊन डोंगर उत्खननात डोळेझाक करत आहेत. त्यामूळे भूस्खलनाची टांगती तलवार भागातील लोकांच्या मानगुटीवर पडत आहे. पुनर्वसनचे प्रश्न अजुन सुटले नाहीत. एकतर्फी राजकारणामुळे 'हम करेसो कायदा' असा प्रकार चालू आहे. या गोष्टी हळूहळू सामान्य जनतेच्या लक्षात येवू लागल्या आहेत. त्यामूळे लोकांना जागृत करुन पस्चिम भागामध्ये गुणवत्ता पात्र कामे करण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे तसेच वाई तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र भिलारे यांच्यासह कार्यकर्ते नियोजनबद्ध कामाला लागले आहेत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in